Home मनोरंजन मी पुरुष असते तर हेलेनसोबत पळून गेले असते- आशा भोसले

मी पुरुष असते तर हेलेनसोबत पळून गेले असते- आशा भोसले


मुंबई- प्रसिद्ध गायिका आशा भोसले या त्यांच्या फक्त गाण्यांसाठीच नाही तर त्यांच्या निर्भिड वक्तव्यांसाठीही ओळखल्या जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं. या चॅनलवर आशाताई त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगतात. फक्त आपल्या आयुष्याबद्दलच नाही तर संगीत आणि त्याच्याशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा देतात.

नुकतच आशा भोसले यांनी चॅनलवर अशी काही गोष्ट शेअर केली की ती ऐकून सारेच अचंबित झाले. आशा ताई यांना बॉलिवूडच्या कॅबरे क्वीन हेलन फार आवडतात. आशा ताई म्हणाल्या की, जेव्हाही त्या रेकॉर्डिंग स्टूडिओमध्ये जायच्या तेव्हा गाणं थांबवून फक्त हेलन यांना पाहत बसायच्या.

रिंकूला बिग बींसोबत काम करण्यापेक्षा जास्त अभ्यासाची चिंता

हेलन यांच्यासाठी आशा भोसले यांचं प्रेम एवढं होतं की नंतर त्यांनी हेलन यांना रेकॉर्डिंग स्टूडिओमध्ये न येण्याची विनंतीच केली. एवढंच नाही तर जर आशाताई पुरुष असत्या तर त्या हेलन यांच्यासोबत पळून गेल्या असत्या असंही त्यांनी मान्य केलं.

..म्हणून आशा ताई यूट्यूबवर आल्या-

यूट्यूब चॅनल सुरू करण्याबद्दल आशा भोसले यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘लॉकडाउनमध्ये घरात असताना मी मुलांना नेटवर काम करताना पाहिलं. या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. पण मुलांकडूनच मी या सर्व गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्षात आलं की हे एक वेगळं जग आणि आणि इथे आपण असलं पाहिजे.’

लॉकडाउनमध्ये रणबीर कपूरनेच कापले आलिया भट्टचे केस?

माझ्यासाठी सारं काही नवीन-

ताई पुढे म्हणाल्या की, ‘यानंतरच मी यूट्यूबवर येण्याचा निर्णय घेतला. इथे मी वयाच्या ८६ वर्षांपर्यंत जे काही शिकले ते लोकांसोबत शेअर करेन. काही गाण्यांमार्फत लोकांचं मनोरंजनही होईल. इथला अनुभव माझा चांगला असेल अशी आशा व्यक्त करते. माझ्यासाठी हाही एक नवीन प्रवास आहे.’

सर्वांपर्यंत पोहोचणं सोप्पं-

आशा भोसले पुढे म्हणाल्या की, ‘सगळीकडे नकारात्मकता आहे. लोकांमध्ये सकारात्मकता पसवरण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. हे एक असं माध्यम आहे ज्याच्या मदतीने कोणीही एकमेकांशी जोडलं जाऊ शकतं. व्हर्च्युअल जग ही या काळाची गरज आहे आणि मागणीही आहे. अशात आपणही नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.’

जावेद अख्तरांनी उडवली शाहिद आफ्रिदीची खिल्ली, अशोक पंडित म्हणाले, ‘लाज बाळगा पाकिस्तान’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

तोफखाना तज्ज्ञाकडे अरबी समुद्राची जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, विनाशिका श्रेणीतील युद्धनौकांच्या तोफांचे तज्ज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांकडे आता संपूर्ण अरबी समुद्राची जबाबदारी आले आहे. या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पश्चिम...

औरंगाबाद : २८ दिवसांत ८९ वाहने चोरीला

म. टा. प्रतिनिधी, शहरात वर्षभरापासून सुरू झालेल्या वाहनचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या २८ दिवसांमध्ये विविध भागातून तब्बल ८९ वाहने चोरीला गेल्याची माहिती...

jee main february exam: जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या – jee main 2021 february exam result will be declared on...

हायलाइट्स:जेईई मेन २०२१ चे पहिले सत्र २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेया परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत होणार जाहीरजेईई मेन २०२१1...

Recent Comments