Home ताज्या बातम्या मुंबईत कोरोनाचा आलेख वाढता; बाधितांची संख्या 30000 पार | News

मुंबईत कोरोनाचा आलेख वाढता; बाधितांची संख्या 30000 पार | News


मुंबईत आज 1725 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 598 जण कोरोनमुक्त झाले आहे व त्यांना घरी पाठवण्यात आले आहे

मुंबई, 24 मे : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही राज्यातील कोरोनाबाधितांची (Covid -19) संख्या झपट्याने वाढत आहे. मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या 30000 पार गेली आहे. आज मुंबईत 1725 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत आज 1725 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 30359 वर पोहचली आहे. आज कोरोनामुळे 39 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 988 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 598 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 8074पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 231 एवढी झालीय. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

पुणे विभागातली स्थिती

पुणे विभागातील  3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

हे वाचा – घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसांठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

तब्बल 3 महिने क्वारंटाइन राहिल्यानंतर चीनहून आलेल्या ‘त्या’ मांजरीची अखेर सुटका

First Published: May 24, 2020 10:37 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

जीएसटीचा नियमसंभ्रम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीसंबंधी केंद्राने एखादे परिपत्रक काढले, तरी राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा अभ्यास करून त्यातील नियम बदलले...

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

Recent Comments