Home ताज्या बातम्या मुंबईत हत्येचा धक्कादायक प्रकार, आईने 7 वर्षाच्या लेकीला ठार करून उचललं टोकाचं...

मुंबईत हत्येचा धक्कादायक प्रकार, आईने 7 वर्षाच्या लेकीला ठार करून उचललं टोकाचं पाऊल Badlapur A mother has committed suicide by killing her seven year old daughter mumbai crime news | Crime


या हत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा शोध घेत आहे.

बदलापूर, 11 जून : बदलापूरमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. सात वर्षाच्या आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार बदलापूर आज समोर आला आहे. या हत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा शोध घेत आहे. मिनाबाई पाटील असं 30 वर्षीय महिलेनं राहत्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास मुलीची गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्या केली.

धक्कादायक म्हणजे मिनाबाई यांचे पती मुंबई पोलिसात कार्यरत आहेत. मुलगी आणि पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूर्व भागातील शिरगाव परिसरात असलेल्या शुभम करोती या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. मिनाबाई यांनी 7 वर्षांची मुलगी आणि पतीसह शुभम करोती इमारतीच्या बिल्डिंग नंबर चारच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होत्या. त्या भाडेकरू होत्या.

मध्यरात्रीच्या सुमारास मिनाबाई यांनी कोणाला कळू नये याकरिता घराचा दरवाजा, खिडक्या बंद करून ही हत्या केली. इमारतीमधील रहिवाशांना हा सगळा प्रकार समजतात परिसरात एकच शोककळा पसरली. मिनाबाई या अबोल स्वभावाच्या असल्यानं त्या इमारतीमधील कोणाशी जास्त बोलत नव्हत्या.

गुगलवर सगळ्यांना दिसतो WhatsApp युजर्सचा फोन नंबर, असा वाचवा तुमचा डेटा

मात्र, त्यांनी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या करण्या इतपत टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही. या हत्येबाबत बदलापूर पोलिसांना माहिती मिळत त्यांनी घटनास्थळी जाणून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पोलीसांनी मिनाबाईच्या यांचे पती, नातेवाईक आणि शेजाऱ्याशी चौकशी सुरू केली आहे. मात्र नैराश्य पोटी की हत्या आणि आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.

First Published: Jun 11, 2020 11:25 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Recent Comments