Home ताज्या बातम्या मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह दोन मुलं जागीच ठार तर पती...

मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह दोन मुलं जागीच ठार तर पती गंभीर जखमी bike accident on mumbai nashik highway mother and 2 son death on spot father injured mhrd | News


एका क्षणात कुटुंब संपलं! रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पत्नी आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू

मुंबई, 27 जून : गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक भीषण अपघात झाले. आताही असाच भीषण अपघात महामार्गावरील वालशिंद हद्दीत घडला आहे. एका अज्ञात वाहनाची दुचाकीला भीषण धडक बसली आहे. यामध्ये आईसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. राबोडी इथल्या पतीच्या मामाकडे पाहुणचार करून बोरिवली (पडघा) इथे पतीसोबत दुचाकीवरून घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात झाली.

दुचाकीवरील महिला आणि तिची दोन मुलं यामध्ये जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावरील वालशिंद गावच्या हद्दीत घडली आहे. अरबीना सलीम खान (26 ), वसीम खान (5 वर्ष 6 महिने) , रिहान खान (3 वर्ष ) अशी  अपघातात ठार झालेल्या माय लेकांची नांवं आहेत. चालक पती सलीम खान (34) हा गंभीर जखमी झाला आहे.

पडळकर वाद आणखी पेटला, राष्ट्रवादीच्या नेत्याला शिवीगाळ करत धमकीचे फोन

सलीम यांना उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा (ऑरेंज हॉस्पिटल ) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान हा त्यांच्या ठाणे इथल्या मामाकडे पत्नी व दोन मुलांना घेऊन होंडा शाईन दुचाकीवरून गेला होता. दुपारचे जेवण उरकून तो कुटुंबियांसह बोरिवली इथे घरी परतत होते. त्यावेळी वालशिंद गावच्या हद्दीत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल? हा बडा नेता पुन्हा एकदा दिल्लीत

या धडकेत दुचाकीवरील चौघेही रोडवर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून दुखापत झाली. अतिरक्तस्रावाने तिघा माय लेकांचा तडफडून जागीच मृत्यू झाला तर दुचालक पती सलीम हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय दिपक भोई करीत आहेत.

संपादन – रेणुका धायबर

First Published: Jun 27, 2020 11:31 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nagpur latest news update: Nagpur: डोळ्यादेखत मुलगा बुडाला; पालकांना बसला जबर मानसिक धक्का – nagpur 13 year old boy drowns in pench river

नागपूर: डोळ्यादेखत पोटच्या पोराने जग सोडावे यापेक्षा मोठे दु:ख कदाचित या जगात नसेल. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सहलीला गेलेल्या एका १३...

green tax: ​तुमच्याकडे ८ वर्षे जुनी गाडी आहे? भरावा लागू शकतो ‘हा’ मोठा कर – green tax will be imposed on old polluting vehicles

नवी दिल्लीः वाहतुकीशी संबंधित ८ वर्षांपेक्षा जुन्या सर्व वाहनांना ग्रीन टॅक्स ( green tax ) भरावा लागेल. हा रस्ते कर १०-२५ टक्के असू...

R Ashwin: ऑस्ट्रेलिया संघासोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही; भारतीय गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा – r ashwin says we were not allowed to enter lift...

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची घटना सर्वांना माहिती आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे...

Recent Comments