घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई, 01 जुलै : मुंबईतील उच्चभ्रू असलेल्या पवईतील हिरानंदानीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मुंबईतील पवई परिसरात हिरानंदानीमध्ये आज सकाळी एका इमारतीला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
मुंबईतील पवई परिसरात हिरानंदानीमध्ये इमारतीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल pic.twitter.com/WiURSMHoZn
— News18Lokmat (@News18lokmat) July 1, 2020
या इमारतीला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. आगीची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
संपादन – सचिन साळवे
First Published: Jul 1, 2020 09:09 AM IST