Home ताज्या बातम्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात मिनी बसचा चक्काचूर, 5 जण गंभीर, breaking...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात मिनी बसचा चक्काचूर, 5 जण गंभीर, breaking Mumbai Pune Expressway accident 5 injured mhas | News


महामार्गावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

नवी मुंबई, 17 मे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली इथं भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून प्रवाशी घेऊन येणाऱ्या खाजगी बसने कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे महामार्गावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कर्नाटकावरून येणाऱ्या बसमधून 9 लोक प्रवास करत होते. यातील 5 जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. बसमध्ये काही लोक अजूनही अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

रविवार ठरला घातवार, महाराष्ट्रातील दुसरा मोठा अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात होण्याआधी पुणे-सोलापूर महामार्गावरही भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. तर लहान मुलगी आणि एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. जखमींना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं आहे. महामार्गावर कार आणि स्कुटीची धडक होऊन हा अपघात झाला.

कोरोनाच्या दहशतीमुळे लोक शहर सोडून आपल्या गावी प्रवास करत आहेत. हा अपघातातही कोरोनाच्या दहशतीमुळे गावाकडे निघालेल्या महिलेचाच बळी गेला आहे. मुंबईवरुन कर्नाटकला जात असताना अपघात झाला. अद्यापर्यंत मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.

संपादन – अक्षय शितोळे

First Published: May 17, 2020 01:47 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nitish kumar cabinet expansion likely soon: बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, कुणाची लागणार वर्णी? – bihar cm nitish kumar cabinet expansion likely soon

पाटणाः बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकारण तापलं असताना नितीशकुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग ( nitish kumar cabinet expansion likely soon ) आला...

US Inauguration Day 2021 Live Update: Joe Biden and Harris Inauguration Day Live बायडन होणार अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष – US Presidential Elections Joe...

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि...

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

Recent Comments