Home मनोरंजन मुंबई पोलीस: हृतिकने विचारलं 'चोर चोरी करणार नाही तर पोलीस काय करणार,'...

मुंबई पोलीस: हृतिकने विचारलं ‘चोर चोरी करणार नाही तर पोलीस काय करणार,’ पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर – mumbai police used dhoom 2 dialogue and share funny tweet abhishek bachchan hrithik roshan


मुंबई- महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनेकदा सिनेमे आणि त्यातील संवादांची मदत घेऊन आकर्षक ट्वीट तयार करत असते. यावेळी त्यांनी चोर- पोलिसांवर एक मजेशीर ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी हृतिक रोशनच्या ‘धूम २’ सिनेमातील एका संवादाचा वापर केला आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशनच्या धूम २ सिनेमातील एक सीन शेअर केला. यात हृतिक हे हुशार चोर आणि अभिषेक पोलीस दाकवण्यात आला आहे. यात हृतिक अभिषेकला बोलतो की, ‘चोर जर चोरी नाही करणार तर मग पोलीस काय करणार?’ याच संवादावर ट्वीट शेअर करत मुंबई पोलिसांनी लिहिलं की, ‘मुंबईचं नाव ‘रोशन’ करणार.’ मुंबई पोलिसांचं हे ट्वीट सध्या तुफान गाजत असून त्यांच्या क्रिएटिव्हिटिला दाद दिली जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून करोना व्हायरस या महामारीशी स्वतःचं संरक्षण करण्याची जनजागृती मुंबई पोलीस वेळोवेळी करत असतं. एवढंच नाही तर या कठीण काळात लोकांची मदत करणाऱ्या सेलिब्रिटींचंही मुंबई पोलीस भरभरून कौतुक करतं. काही दिवसांपूर्वी हृतिकने पोलिसांची मदत केली होती. यानंतर ट्वीट करून मुंबई पोलिसांनी हृतिकचं कौतुकही केलं होतं.
मुंबई पोलिसांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘मुंबई पोलिसांच्या ऑन ड्युटी अधिकाऱ्यांसाठी हँडसॅनिटायझर पाठवण्यासाठी हृतिक तुमचे आभार. आमच्या योद्ध्यांच्या सुरक्षेचा तुम्ही जो विचार केला त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.’ या ट्वीटला उत्तर देताना हृतिकने लिहिले की, ‘आमच्या पोलीस दलाचे आभार, ज्यांनी आमची सुरक्षा त्यांच्या हातात घेतली आहे. सुरक्षित रहा.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Recent Comments