Home शहरं मुंबई मुंबई लोकल: आता लोकल प्रवासाचीही मुभा द्या - now allow local travel...

मुंबई लोकल: आता लोकल प्रवासाचीही मुभा द्या – now allow local travel for common people after coronavirus lockdown


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शनिवारी केली आहे.

‘करोना संकटाचा मुकाबला आपल्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. आपल्या धीरोदात्त मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र या संकटातून लवकरच मुक्त होईल,’ असा सार्थ विश्वास संघटनेला आहे. १५ जूनपासून मुंबईत उपनगरी रेल्वे लोकल सेवा सुरू केल्याबद्दल संघटना आपली ऋणी आहे. परंतु सद्यस्थितीत मंत्रालय व अन्य काही सरकारी कार्यालये वगळता अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने मज्जाव केला आहे, याकडे दौंड यांनी लक्ष वेधले.

वास्तविक बृहन्मुंबईमधील ९० टक्के सरकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी लोकलने प्रवास करतात. ८ जूनच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार फक्त पोलिस, सरकारी आरोग्य सेवा आणि मंत्रालयीन कर्मचारी यांनाच प्रवासाची मुभा देण्यात येत असून याआधारे अनेक रेल्वे स्थानकांत सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवेशच दिला जात नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत विरार, कल्याण, कसारा, कर्जत, पनवेल या ठिकाणाहून बसने प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे होत आहे. यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करण्याची अनुमती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून रेल्वे प्रशासनाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी दौंड यांनी केली आहे.

धीमी लोकल असावी

आता जलद आणि धीम्या दोन्ही लोकल ठराविक फेऱ्यांत सुरू झालेल्या आहेत. मात्र, धीम्या लोकल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कसारा ते कल्याण आणि कर्जत ते कल्याण या दरम्यानच्या उपनगरात अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी सर्व स्थानकांमध्ये लोकल थांबवण्यात यावी. सध्या विरार जलद लोकल या मुंबई सेंट्रलहून थेट चर्चगेट येथे ये-जा करत आहेत, या फेऱ्या पूर्वीप्रमाणे दरम्यानची सर्व स्थानके घेणाऱ्या असाव्यात, अशी या संघटनेची मागणी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

children engage in mobile games: व्हर्च्युअल खेळांमध्ये अडकतेय बालपण – most of children are engage their time in virtual games

म. टा. प्रतिनिधी, नाशिकशालेय वयोगटातील मुला-मुलींच्या हाती मोबाइल देण्याचे पालक टाळत आले असले तरी, यावर्षी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल विद्यार्थ्यांच्या हातात द्यावाच लागत आहे....

chatting on whatsapp: ऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन – amazing trick of chatting on whatsapp while offline, no one...

नवी दिल्लीः Whatsapp वर खूप सारे फीचर्स मिळत आहेत. परंतु, एका फीचरची उत्सूकता संपत नाही. जर तुम्हाला उशीरा रात्री पर्यंत चॅटिंग करण्याची सवय...

chandrakant patil: Chandrakant Patil: ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी… विरोधकांना ‘हा’ डोस घ्यावाच लागतो!’ – chandrakant patil targets shiv sena and maha vikas aghadi

पंढरपूर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले...

Recent Comments