Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांना दिसली गर्दी; पोहरादेवीला जमलेल्या 10 हजार समर्थकांवर गुन्हा दाखल...

मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांना दिसली गर्दी; पोहरादेवीला जमलेल्या 10 हजार समर्थकांवर गुन्हा दाखल | Crime


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नाराजीनंतर आता वाशिम पोलिसांना जाग आली आहे. वाशिम पोलिसांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थनासाठी (Supporters) जमलेल्या 8 ते 10 हजार लोकांवर रात्री उशीरा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

वाशिम, 23 फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यू (Pooja Chavhan) प्रकरणाला आज सोळा दिवस झाले आहेत. मात्र तरीही तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणात गेल्या पंधरा दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) नुकतेच वृत्तमाध्यमांपुढे आले होते. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. पण पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू फोफावत असताना अशाप्रकराचं शक्तीप्रदर्शन करणं, सार्वजानिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता रात्री आठ वाजता वाशिम पोलिसांना जाग आल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा –पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांच्याशी संबंधित आणखी एक VIDEO झाला लीक

कारण उद्धव ठाकरे यांच्या नाराजीनंतर आता वाशिम पोलिसांनी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांना गर्दी दिसली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गुन्हा आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी सकाळी शक्ती प्रदर्शन केलं असताना वाशिम पोलिसांना गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का लागला असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.


Published by:
News18 Desk


First published:
February 23, 2021, 11:22 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

Recent Comments