Home ताज्या बातम्या मुलाचं दुसरं लग्न करण्यासाठी सूनेचा अडसर, सासरच्या मंडळींनी मिळून रचला कट आणि...,katihar-for-second-marriage-of-son-in-laws-murder-daughter-throw-dead-body-in-tank...

मुलाचं दुसरं लग्न करण्यासाठी सूनेचा अडसर, सासरच्या मंडळींनी मिळून रचला कट आणि…,katihar-for-second-marriage-of-son-in-laws-murder-daughter-throw-dead-body-in-tank mhak | Crime


महिलेचा आठ वर्षांचा मुलगा बोलला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपास नेत पूर्ण केला आणि हत्येचा उलगडा झाला.

पाटना 26 जून: बिहारमधला (Bihar) कटिहार (Katihar) जिल्हा हत्येच्या एका घटनेनं हादरून गेला आहे. मुलाचं दुसरं लग्न करण्यासाठी सासरच्या मंडळींनी कट रचून सूनेची हत्या (Murder) केली. एवढ नाही तर क्रुरतेचा कळस म्हणजे त्या मंडळींनी तिचा मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातल्या सेप्टिक टँकमध्ये टाकला. पीडीत महिलेच्या मुलामुळे सगळी घटना उघडकीस आली.

जिल्ह्यातल्या आजमनगर इथं मोहम्मद नादीर पत्नीसह राहत होता. त्याला 8 वर्षांचा मुलगाही होता. मात्र दुसरं लग्न करण्यासाठी तो पत्नीवर दबाव टाकत होता. मात्र ती परवानगी देत नसल्याने त्याने आई वडिलांच्या मदतीने तिची हत्या केला. हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह टँकमध्ये टाकून दिला.

महिलेचा आठ वर्षांचा मुलगा बोलला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपास नेत पूर्ण केला.  त्यावेळी त्यांनी तो सगळा कट उघडीस आला. त्यावेळी पोलिसही हादरून गेले होते.

घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम राबवली. त्यावेळी पीडीत महिलेच्या मुलाने घरच्या मंडळींनी टँकमध्ये काहीतरी टाकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी नादीर आणि आणि त्याच्या आईला अटक केली आहे. तर वडिल फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

 

First Published: Jun 26, 2020 11:52 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Recent Comments