Home ताज्या बातम्या मृत्यूचं तांडव! एका क्षणात जमिनीखाली दबून 50 मजूरांचा मृत्यू, भूस्खलनाचा थरारक LIVE...

मृत्यूचं तांडव! एका क्षणात जमिनीखाली दबून 50 मजूरांचा मृत्यू, भूस्खलनाचा थरारक LIVE VIDEO | News


म्यानमारमधील जेड खाणीत झालेल्या भूस्खलन तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर अनेक मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

काचिन, 02 जुलै : एकीकडे जगावर कोरोनाचं संकट असताना आता भूस्खलन सारखी आपत्ती काही देशांमध्ये येत आहे. म्यानमारमधील जेड खाणीत झालेल्या भूस्खलन तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर अनेक मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशाच्या अग्निशमन विभाग आणि सूचना मंत्रालयानं याबाबत माबिती दिली.

म्यानमारमधील काचिन राज्यातील जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात शेकडो मजूर दगड फोडण्याचे काम करत होते. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता अचानक भूस्खलन झाले आणि सर्व मजूर जमिनीखाली दबले गेले. अग्निशमन विभागानं याबाबत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली.

या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे ही सध्या 50 शव बाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून, आणखी किती लोकं अडकले आहेत का, याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या भूस्खलनाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की क्षणार्धात भूस्खलनमुळं मजूर जमिनीखाली दबले गेले. मुख्य म्हणजे या परिसरात पावसाळ्यात भूस्खलन होत असते, याआधीही असे प्रकार घडले आहे, तरी या खाणींमध्ये मजूर का काम करतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

संपादन-प्रियांका गावडे.

Tags:

First Published: Jul 2, 2020 12:21 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ssc-hsc re-exams 2020: दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये – ssc-hsc re-exams 2020 to be conducted in november december month, application process started

SSC-HSC Re-Exams 2020: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा यंदा कोविड-१९ संक्रमण स्थिती आणि त्यामुळे पुकारलेल्या...

flowers change colour: फुलं बदलताहेत आपले रंग – flowers change colour

तापमान वाढीमुळे जगाचे पर्यावरण ज्या पद्धतीने बदलत चालले आहे त्याच्याशी सृष्टीतील प्राणी तसेच वनस्पती स्वत:ला जोडून घेऊ लागले आहेत. वाढते तापमान आणि घटते...

Recent Comments