Home ताज्या बातम्या मोठी बातमी! गँगस्टरला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, DSP सह 8 पोलीस शहीद...

मोठी बातमी! गँगस्टरला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, DSP सह 8 पोलीस शहीद | National


या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत.

कानपूर, 03 जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरारक घटना समोर आली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या पथकावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटलं. . एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली.

हत्या करण्यासाठी आलेल्या अज्ञातांनांकडून सलग गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला पोलीस दलानं प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर 4 शिपायी जखमी आहेत. 7 ते 8 जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी STF ची मदतही पोलीस दल घेणार असून STF आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कानपूर शहर हादरून गेलं आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First Published: Jul 3, 2020 06:54 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments