Home ताज्या बातम्या मोदींची मोठी घोषणा : 80 कोटी गरीब जनतेला मोफत अन्न योजनेचा विस्तार...

मोदींची मोठी घोषणा : 80 कोटी गरीब जनतेला मोफत अन्न योजनेचा विस्तार | National


गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले.

मुंबई, 30 जून : नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छठ पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाईल. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला सुविधा पोहोचविणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर

-अनलॉकमध्ये वैयक्तिक व सोशल डिस्टन्सिंगवर दुर्लक्ष केलं जात आहे. ही चिंतेची बाब आहे.

-लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. अनलॉकमध्येही देशातील नागरिक, संस्थांनी पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.

PM Modi Speech Live

-कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.

-भारतातही स्थानिक सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. भारतात गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

हे वाचा-भारतात 59 चिनी अॅप्सवरील बंदीनंतर पहिल्यांदा चीनने दिली प्रतिक्रिया

-लाखो लोकांचे प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, टोकायला हवं आणि समजवायला हवं. स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही.

-गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले.

-प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मिळेल.

 

 

 

First Published: Jun 30, 2020 04:16 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis writes to CM Thackeray: Metro Carshed: मेट्रो कारशेड प्रश्नी फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंना सावध – opposition leader devendra fadnavis has written letter...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत...

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Recent Comments