Home ताज्या बातम्या मोदींची मोठी घोषणा : 80 कोटी गरीब जनतेला मोफत अन्न योजनेचा विस्तार...

मोदींची मोठी घोषणा : 80 कोटी गरीब जनतेला मोफत अन्न योजनेचा विस्तार | National


गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार रुपये जमा केले गेले, असे मोदी यावेळी म्हणाले

मुंबई, 30 जून : देशातील कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पातळीपासून सर्वांनीच अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छट पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाई. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-वेळीत लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर

-अनलॉकनंतर वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष केलं आहे. ही चिंतेची बाब आहे.

-लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.

PM Modi Speech Live

-कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.

-भारतातही स्थानिक सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. भारतात गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी.

-लाखो लोकांचं प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, टोकायला हवं आणि समजवायला हवं. स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही.

-गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार रुपये जमा केले गेले.

-प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या  सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दर महिन्याला मिळेल.

 

 

 

First Published: Jun 30, 2020 04:16 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ajinkya Rahane: IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला, पाहा… – ind vs aus : indian captain ajinkya rahane what...

ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयानंतर अजिंक्यवर जोरदार कौतुक होत आहे. पण...

दिल्लीतील 'या' अधिकाऱ्याच्या नावानं पुणे मेट्रोच्या संचालकांना फोन, म्हणाला…

पुणे: केंद्रीय सचिवांच्या नावाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कंत्राट मिळवून देण्यास सांगितल्याचा...

Surat Truck Accident: सूरत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत! – ‘the loss of lives due to a truck accident in surat is...

नवी दिल्ली : गुजरातच्या सूरतमध्ये एका फुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकनं चिरडल्यानं तब्बल १५ मजुरांना प्राण गमवावे लागलेत. सूरत जिल्ह्याच्या कोसंबामध्ये हा अपघात घडला. या...

Recent Comments