Home ताज्या बातम्या 'मोदी सरकारनं लस मोफत दिली नाही तर...' केजरीवाल यांची मोठी घोषणा |...

‘मोदी सरकारनं लस मोफत दिली नाही तर…’ केजरीवाल यांची मोठी घोषणा | Coronavirus-latest-news


जगभरात कोरोनाच्या लशीचं उत्पादन कमालीच्या वेगात केलं जात आहे. भारतासारख्या देशात ही लस मोफत दिली जाणार का याभोवती सध्या चर्चा फिरते आहे.

नवी दिल्ली, 14 जानेवारी : देशभरात आता लसीकरणाची (vaccination) तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ही लस मोफत (free vaccine) दिली जावी असं देशात अनेकजण आवाहन करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी एकदा पुन्हा आवाहन केलं आहे, की देशभरात लोकांना लस मोफत दिली जावी. दिल्लीचा उल्लेख करून केजरीवाल म्हणाले, की केंद्र सरकार (Central Government) इथल्या लोकांना मोफत लस देत नसेल तर दिल्ली सरकार स्वखर्चानं दिल्लीच्या जनतेला मोफत लस देईल.

सीएम केजरीवाल कायमच कोरोनाची लस मोफत दिली जावी अशी मागणी करत आले आहेत. आपल्या मागणीला केजरीवाल यांनी बुधवारी पुन्हा एकदा ठळक केलं. ‘केंद्र सरकारला विनंती केली होती, की आपला देश खूप गरीब आहे. आणि ही महामारी 100 वर्षांतून पहिल्यांदाच आली आहे. बहुसंख्य लोक असे आहेत, की त्यांना याचा खर्च उचलता येणार नाही. त्यामुळं केंद्राला विनंती केली होती, की सगळ्या देशाला ही लस मोफत दिली जावी. जर केंद्रानं लस मोफत दिली नाही, तर गरज पडल्यास आम्ही दिल्लीच्या लोकांना ही लस मोफत देऊ.

दिल्लीसह सगळ्या देशभरात 16 जानेवारीपासून मोफत कोरोना लसीकरण अभियान सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात देशात जवळपास 3 कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांचा समावेश आहे. यानंतर 50 वर्षांहून अधिक वयाच्या 27 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येईल. मात्र या वयोगटातील लोकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल की नाही, ते अजून स्पष्ट झालेलं नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे, की हे दोघेही आपापल्या राज्यातील लोकांना मोफत कोरोनाची लस देतील. बिहार निवडणुकांदरम्यान भाजपानंही आम्ही सत्तेत आलो तर मोफत कोरोनाची लस देऊ असं आवाहन केलं होतं.


Published by:
News18 Desk


First published:
January 13, 2021, 11:41 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia Scorecard: Australia All Out On 294 Runs On Day 4 Of 4th And Final Test In Brisbane, India Required 324 Runs...

ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने...

Recent Comments