Home ताज्या बातम्या ‘म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?’ भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, Bjp leader...

‘म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?’ भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, Bjp leader ashish shelar criticized cm uddhav Thackeray over his speech mhak | News


राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का?

मुंबई 24 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करत राज्यातल्या जनतेला सरकार करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. ही माहिती देत असतानाच त्यांनी भाजपलाही नाव न घेता टोले हाणले. दोन दिवसांपूर्वीच भाजपने राज्यभर आंदोलन करत महाराष्ट्र वाचवा अशी हाक दिली होती आणि पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर केवळ पोकळ आश्वासनांचं पॅकेज नको अंमलबजावणी पाहिजे. ही राजकारणाची वेळ नाही असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं होतं. त्यावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

आत्ता पॅकेज नाही म्हणता मग केव्हा देणार? असा सवाल त्यांनी केला. मेल्यावर पॅकेज देता का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. सगल चार ट्वीट करत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

शेलार म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात, आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..! आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?” मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करुन दाखवा!

राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही. म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारच!” कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब, आता तरी करुन दाखवा!!

एकदा म्हणता पावसाळ्या पुर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करु. आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत. आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मा.महोदय, रोज भाषण,दिशा बदलतेय! आता बोलून नको, करुन दाखवा! अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्यात कोरोनाचा धोका वाढणार आहे. पण त्याची काळजी करण्याचं कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या पॅकेजवर जोरदार टीका केली आहे. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत.

ते पुढे म्हणाली की, रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढत आहे. मात्र, हे संकट एवढं मोठं आहे की त्यावर तयारी करण्यासाठी वेळ लागला. 1 हजारहून आता 7 हजार बेड रुग्णालयात उपलब्ध होतील. जनतेनं शिस्थ पाळली म्हणून कोरोनावर मात करणं शक्य झालं. हा आजार गुणाकाराने वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शहरांमध्ये जनजागृती करणारे होर्डिेंग्स लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रामध्ये दीड लाख आकडा असले असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक्षात 33 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 13 हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे सगळं नागरिकांमुळे शक्य झालं आहे, तर साडे तीन लाखाच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. 1577 मृत्यू झाले आहेत. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांची बालक निगेटिव्ह जन्माला आली. छोट्या बालकांपासून मोठ्यांपर्यंत लोक बरे होत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

First Published: May 24, 2020 04:53 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

सिद्धार्थ आनंद: सहाय्यक दिग्दर्शकाने मारलंच नाही, जाणून घ्या ‘पठाण’च्या सेटवर नक्की काय घडलं – story behind pathan movie director siddharth anand fight

मुंबई-शाहरुख खान यांच्या आगामी 'पठाण' सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण...

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचं जावडेकरांना महत्त्वाचं पत्र; केली ‘ही’ विनंती – mangrove conservation aditya thackerays letter to prakash javadekar

मुंबई: राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास वा सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे...

Recent Comments