Home ताज्या बातम्या ...म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट So the lockdown...

…म्हणून ठाण्यात 11 जुलैपर्यंत लॉकडाउन, पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट So the lockdown in Thane till July 11 clear by the Municipal Commissioner vipin sharma mhss | Maharashtra


लॉकडाउन करणे म्हणजे फक्त लोकांना घरातून बाहेर पडू न देणे हे चुकीचे आहे.

ठाणे, 30 जून : लॉकडाउन करणे म्हणजे फक्त लोकांना घरातून बाहेर पडू न देणे हे चुकीचे आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाय योजना करुन कोरोनाबाधित रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांनी दिली.

ठाण्यात 2 जुलैपासुन लॉकडाउन लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका आयुक्त स्वत: अनेक भागात जाऊन नागरिकांशी, लोक प्रतिनिधींशी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधत आहे. जेणेकरुन लॉकडाउनमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, लोक प्रतिनिधींनी काय केले पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे सर्व आयुक्त समजून घेत आहे.

भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन, गोपीचंद पडळकरांना झापले

2 जुलै ते 11 जुलै या लॉकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची साखळी तोडून ठाण्यात  कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या कमी करायची आहे. जेणेकरुन यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल आणि बाधितांना योग्य उपचार मिळतील, असा विश्वास विपीन शर्मा यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्ही मोडलेल्या नियमांमुळे काय परिणाम झाला हे एकदा वाचाच

ठाणे मनपा हद्दीत लागू होणाऱ्या लॉकडाउन आधी आयुक्त विपीन शर्मा यांचे दौरे हे महत्वाचे मानले जात आहे. आयुक्तांच्या दौऱ्यामुळे सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. विपीन शर्मा हे  रोज विविध भागात पाहणी करणार आहेत. आज ठाण्यातील किसन नगर, भडवाडी या भागात आयुक्तांनी दौरा केला आहे.

संपादन – सचिन साळवे

First Published: Jun 30, 2020 12:38 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

manasi naik wedding: शुभ मंगल सावधान! अभिनेत्री मानसी नाईक अडकली विवाहबंधनात – manasi naik ties the knot with pardeep kharera

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा...

hsc exam 2021: बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना बोर्डाचा मोठा दिलासा – hsc exam 2021 maharashtra boad gives relief to those students with old subjects

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची...

Recent Comments