Home ताज्या बातम्या 'या' मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर alert...

‘या’ मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर alert pnb bank reduced interest on saving account from 1st july 2020 know new rate here mhjb | News


देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यवधी खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले आहे.

नवी दिल्ली, 01 जुलै : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) ग्राहकांना मोठा झटका मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यवधी खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले (Reduced Interest on Saving Account) आहे. पीएनबीने (PNB) त्यांचे बचत खात्यावरील व्याजदर घटवले आहेत. बँकेने रेपो रेटशी लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर RLLR 6.65 टक्के करण्यात आला आहे. याआधी RLLR 7.06 टक्के इतका होता.

त्याचप्रमाणे 1 जुलैपासून बँकेतील बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपये रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3.25 टक्के व्याज मिळेल. याआधी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय (SBI) आणि कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) देखील व्याजदरामध्ये कपात केली होती.

(हे वाचा-ATMमधून पैसे काढणे आणि बचत खात्यात रक्कम ठेवण्याबाबत आजपासून बदलणार हे नियम)

पंजाब नॅशनल बँक एफडीवर देते एवढे व्याज

-1 ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के

-2 ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.10 टक्के

(हे वाचा-आजपासून बदलणार हे 10 महत्त्वाचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

-3 ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.30 टक्के

-5 वर्षांच्या एफडीसाठी 5.40 टक्के

-5 ते 10 वर्षांच्या एफडीसाठी 5.40 टक्के

संपादन – जान्हवी भाटकर

First Published: Jul 1, 2020 01:10 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Try To Copy MS Dhonis Style Attempt Failed – Video धोनीचा कॉपी प्रयत्न फसला, पंतने करून घेतले हसं; पाहा शिखर धवनचा राग

नवी दिल्ली: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात काल मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ( kxip vs dc) पाच विकेटनी विजय मिळवला. या विजयामुळे...

अंकिता लोखंडे: अंकिता लोखंडेने साडीत केला हॉट डान्स, व्हिडिओ व्हायरल – ankita lokhande saari dance video viral

मुंबई- अंकिता लोखंडेने छोटा पडदा सोडून बॉलिवूडची वाट धरली. 'मणिकर्णिका' सिनेमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. आता हळूहळू तिच्यातले अभिनेत्रीचे नखरेही समोर येत आहेत....

EPFO payroll increased in august: शुभसंकेत; अर्थव्यवस्था सावरतेय, आॅगस्टमध्ये १० लाख नव्या नोकऱ्या – payrolls increased by two million in august sign of recovering...

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO latest number of payrolls) कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पाच महिन्यांमध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य...

Recent Comments