Home ताज्या बातम्या या मोठ्या राज्यात लपवले 200 कोरोना रुग्णांचे मृत्यू, माहिती उघड झाल्याने खळबळ!,...

या मोठ्या राज्यात लपवले 200 कोरोना रुग्णांचे मृत्यू, माहिती उघड झाल्याने खळबळ!, nearly-200-missing-covid-19-deaths-from-tamil-nadus- govt-probe starts mhak | Coronavirus-latest-news


राज्यातल्या अनेक मेडिकल हॉस्पिटल्समध्ये जे मृत्यू झाले त्याची नोंदच ठेवण्यात आलेली नाही. त्यातल्या अनेकांना कोविड-१९ची लागण झालेली होती.

चेन्नई 12 जून:  तामिळनाडूमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढतोय. कोरोनाविरुद्धचा संघर्ष तीव्र होत असतानाच काही माहीती बाहेर आल्याने खळबळ माजली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखविण्यासाठी अनेक रुग्णांच्या मृत्यूची नोंदचं करण्यात आली नसल्याचं आढळून आलं आहे. त्या रुग्णांच्या मृत्यूचं कारण हे दुसराच आजार असल्याचं नोंदविण्यात आलं आहे. मात्र त्या रुग्णांना कोरोना होता असा आरोप आता होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्यातल्या अनेक मेडिकल हॉस्पिटल्समध्ये जे मृत्यू झाले त्याची नोंदच ठेवण्यात आलेली नाही. त्यातल्या अनेकांना कोविड-१९ची लागण झालेली होती. अशी अनेक प्रकरणं असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तामिळनाडूमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 350 मृत्यू झाले आहेत. अनेक मृत्यूची नोंद ही कोरोनाच्या यादीत झालेली नाही असं आढळून आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्यातल्या कोरोना मृत्यूची संख्या कमी दाखविण्यासाठीच स्थानिक पातळीवर अधिकारी अशा प्रकारची नोंद करत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे.

भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे.

जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

12 वर्षांखालच्या मुलांना Corona लस घेतल्याशिवाय शाळा नको यासाठी कोर्टात याचिका

देशभरातील दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येवरून सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने ‘दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची अवस्थाही एखाद्या जनावरापेक्षाही वाईट आहे’, असा संताप व्यक्त केला आहे.

देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांकडून पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेवर परखड भाष्य केलं आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी लोक काय करतात पाहा, लाॅकडाऊनमधले 11 सर्वात भन्नाट जुगाड

‘दिल्लीतील वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची अवस्था अत्यंत भीषण आहे. काही रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृतदेह हे कचराकुंडीत पाहण्यास मिळाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची अवस्था ही जनावरपेक्षाही वाईट आहे. हे अत्यंत भीषण आहे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारून काढले आहे.

संपादन – अजय कौटिकवार

 

First Published: Jun 12, 2020 03:50 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jaan kumar sanu controversial statement: आता मराठी माणसं तुला थोबडवनार; जान कुमार सानूला मनसेचा इशारा – bigg boss 14 contestant jaan kumar sanu controversial...

मुंबई: भांडणं, वाद असं समीकरणच असलेल्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये स्पर्धकाकडून मराठी भाषेचा अवमान केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध गाय...

aurangabad murder case: पार्टी केल्यानंतर हाणामारी झाली, मित्रानेच केला मॉन्टी सिंहचा खून – Aurangabad News Monty Singh Was Killed By Friend

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पार्टी केल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास झालेल्या वादानंतर आपसात हाणामारी झाली. यानंतर मॉन्टी सिंह बिहारी उर्फ मंटूश कुमार सिंह याचा...

Mehbooba Mufti Slams BJP After Nia Raids in Jammu And Kashmir – NIA भाजपची पाळीव बनली आहे; मेहबूबा मुफ्तींनी साधला निशाणा

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufi) यांनी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टाकलेल्या छाप्यांनंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे....

Recent Comments