Home शहरं नाशिक युसूफ मेमन: युसूफ मेमनचे इन कॅमेरा होणार शवविच्छेदन - yusuf memon autopsy...

युसूफ मेमन: युसूफ मेमनचे इन कॅमेरा होणार शवविच्छेदन – yusuf memon autopsy will perform on camera


म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला युसूफ मेमन याला नाशिक कारागृहात हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह मोठा भाऊ सुलेमान मेमन याच्या ताब्यात देण्यात आला.

मुंबईत सन १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन (वय ५४) याला शुक्रवारी सकाळी नाशिक मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी युसूफला तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा सायंकाळी मृत्यू झाला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करण्यासाठी नाशिकहून शुक्रवारी रात्री उशिरा युसूफचा मृतदेह धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला. यावेळी मृतदेहाची तपासणी करून शनिवारी सकाळी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान शवचिच्छेदन करण्यात आले. यावेळी मुंबईतील माहिम येथून युसूफचा मोठा भाऊ सुलेमान मेमन व इतर नातेवाईक धुळ्यात दाखल झाले होते.

शवचिच्छेदनानंतर सर्व सोपस्कार जिल्हा पोलिस विभागाकडून पार पाडून मोठा भाऊ सुलेमानसह नातेवाईकांच्या ताब्यात युसूफचा मृतदेह देण्यात आला. रुग्णवाहिकेने धुळ्याहून मृतदेह ताब्यात घेत अडीच वाजेच्या सुमारास मुंबईकडे ते रवाना झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाजवळ शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Recent Comments