Home देश योगी आदित्यनाथांना पितृशोक; लॉकडाउनमुळे अंत्यसंस्काराला जाणार नाहीत

योगी आदित्यनाथांना पितृशोक; लॉकडाउनमुळे अंत्यसंस्काराला जाणार नाहीत


नवी दिल्ली/लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पिता यांचे दीर्घ आजाराने आज दिल्लीत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारने ही माहिती दिली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे पिता आनंदसिंह बिष्ट यांचे आज सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी निधन झाले. आम्ही त्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत आहोत, असे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त प्रधान सचिव (गृह) अवनीश अवस्थी यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पंचूर गावचे रहिवासी अशलेले आनंदसिंह बिष्ट यांची गेल्या महिन्यात आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. इथे त्यांना एबी वॉर्डात ठेवण्यात आले होते. गॅस्ट्रो विभागाचे डॉ. विनीत आहूजा यांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, रविवारी त्यांची तब्येत खालावली होती.

आनंदसिंह बिस्ट यांना दीर्घ काळापासून मूत्रपिंडाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांचे डायलिसीस देखील केले होते. पौडी येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सुरुवातीला जॉलीग्राँटच्या हिमालयन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मात्र, इथे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. आनंदसिंह हे उत्तराखंडमध्ये फॉरेस्ट रेंजर होते. ते सन १९९१ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर ते गावी येऊन राहू लागले.

लॉकडाउनमुळे पित्या अंत्यसंस्काराला येऊ शकणार नाही- योगी आदित्यनाथ
दरम्यान, आपण शोकग्रस्त असून लॉकडाउनमुळे आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्य पित्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पित्याच्या दु:खद निधनाबाबत सहसंवेदना व्यक्त करताना शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

second side of farm loan waiver: कर्जमाफीची दुखरी बाजू – devidas tuljapurkar article on second side of farm loan waiver

देविदास तुळजापूरकरकृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना, याच घटकांशी संबंधित; परंतु सर्वस्वी वेगळ्या आणि सर्वार्थाने देशव्यापी अशा एका प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा...

sushant singh rajput latest news: Sushant Singh Rajput: ‘भाजप सुशांतसिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही’ – bjp does not allow sushant singhs soul to...

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश...

Sambhaji Bidi: ७० वर्षांनंतर संभाजी बिडीचे नाव बदलले, आता या नावाने विक्री करणार – sambhaji bidi to be disappeared, company change product name

म.टा. प्रतिनिधी, नगर: विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यामातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले...

Recent Comments