Home देश रसेल्स वायपर: घराच्या बाथरुममध्ये आढळला विषारी साप, ३५ पिल्लांना जन्म - coimbatore...

रसेल्स वायपर: घराच्या बाथरुममध्ये आढळला विषारी साप, ३५ पिल्लांना जन्म – coimbatore russells viper gives birth to 35 hatchlings in bathroom of a house


कोईम्बतूर, तामिळनाडू : तामिळनाडूच्या कोईम्बतूर (Coimbatore) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कोईम्बतूरच्या कोविमेडू नावाच्या गावात एका घरात बाथरुममध्ये अतिशय विषारी (Venomous Snake) समजला जाणारा रसेल्स वायपर जातीचा एक साप आढळला. सर्पमित्राला याची बातमी मिळाल्यानंतर त्यानं घटनास्थळी येऊन सापाला ताब्यात घेतलं. यावेळी सापानं तब्बल ३५ पिल्लांना एकाच वेळी जन्म दिला. हे पाहून उपस्थित दंग राहिले.

कोविमेडूचे रहिवासी असलेल्या मनोहरन यांना आपल्या घराच्या बाथरुममध्ये एक मोठा साप आढळला होता. हे पाहून अगोदर ते घाबरले पण त्यांनी लागलीच याची सूचना मुरली नावाच्या एका सर्पमित्राला दिली आणि सापाला ताब्यात घेण्याची विनंती केली.

मुरलीनं पाहिलं तेव्हा हा रसेल्स वायपर नावाचा साप असल्याचं त्याच्या लक्षात आलं. रसेल्स वायपर हा अतिशय विषारी सापांपैंकी एक म्हणून ओळखला जातो.

मुरलीनं जंगलात सोडून देण्यासाठी सापाला ताब्यात घेऊन एका पोतडीत बंद केलं. परंतु, काही वेळातच मादी साप पिल्लांना जन्म देत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

त्यानं हातातली पोतडी एका झाडाखाली ठेवली. दोन तासानंतर या पोतडीत ३५ छोट्या सापांनी जन्म घेतल्याचं निदर्शनास आलं. या सर्व सापांना इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलमच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.

सामान्यत: साप अंडी देतात त्यानंतर ही अंडी उबवल्यानंतर त्यातून सापाची पिल्लं बाहेर पडतात. परंतु, रसेल्स वायपर साप शरीरातच अंड्यांना उबवून पिल्लांना जन्म देतात.

रसेल्स वायपरनं एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर त्याचा काही वेळातच मृत्यू होण्याचा धोका असतो.

वाचा :YES Bank: सर्वोच्च न्यायालयानं वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
वाचा :देशात पहिल्यांदाच २४ तासांत १७ हजार नवे रुग्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Mount Everest: खरंच भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टची उंची कमी झाली ? नवी उंची जाहीर होणार – nepal and china to announce revised height of mount...

काठमांडू: नेपाळमध्ये २०१५ साली झालेल्या भूकंपानंतर जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची घटल्याचा दावा केला जात होता. या दाव्यात किती तथ्य...

Recent Comments