Home शहरं नागपूर रस्त्यांवरील विमनस्कांना करोनाचा धोका

रस्त्यांवरील विमनस्कांना करोनाचा धोकाम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

उपराजधानीतील अनेक चौकांमध्ये विमनस्क अथवा एकटेच राहणारे वृद्ध आढळून येत आहेत. अशा विमनस्क नागरिकांना करोना होण्याचा धोका असून त्यांच्यामुळे परिसरातही करोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे मनोरुग्णालयात तात्काळ विलगीकरण करावे, त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी ‘ग्यात’ या संस्थेचे वसुबंधू माणके यांनी महपालिका आयुक्तांना केली आहे.

शहरातील विविध चौकात विमनस्क, अपंग अथवा बेघर नागरिक फिरत आहेत. त्यांच्यावर कोणाला दया आली तर त्यांना अन्नधान्य देण्यात येते. करोनामुळे घोषित झालेल्या लॉकडाउनमुळे शहरातील रहदरीही कमी झाली. त्यामुळे अशा विमनस्क व बेघर नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. शहरातून जेव्हा मोठ्या संख्येने श्रमिकांचे स्थलांतरण सुरू झाले तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी अन्नधान्य त्यांना देण्याचे काम हाती घेतले. त्यावेळीच वसुबंधू माणके यांची नजर चौकातील अशा बेघर व विमनस्क नागरिकांवर पडली. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अशा नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु, या नागरिकांना आता करोना होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा बेघर व विमनस्क फिरणाऱ्या नागरिकांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करण्यात यावे, तिथे त्यांच्यावर उपचार करावेत, तसेच त्यांच्या पुनर्वसनाची सोय करावी, अशी विनंती करणारे निवेदन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनाही करण्यात आले. इतकेच काय राज्य सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ई-मेलवर निवेदने पाठवून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न माणके यांनी केला. परंतु, त्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.

हायकोर्टाच्या आदेशांचे काय?

बेघर अथवा विमनस्क नागरिकांकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका आर. पी. जोशी यांनी हायकोर्टात सादर केली होती. त्यावेळी त्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने शहर पोलिसांना अशाप्रकारे रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर अथवा विमनस्क नागरिकांना शोधून त्यांना एकतर शेल्टर होम अथवा मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर काहीकाळ ही कारवाई करण्यात आली. परंतु, नंतर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करोनामुळे आज रस्त्यावर कोणीही नाही, अशावेळी भर उन्हात चौकात कोठेतरी बसलेले हे बेघर व विमनस्क नागरिक दिसतात. अनेकदा रात्री बेवारस कुत्रे अशा विमनस्कांवर हल्ले करतात. देवनगर, पंचशील चौक, अलंकार टॉकिज चौक, शंकरनगर, गांधीबाग, इतवारी, महाल, रेशीमबाग, तुकडोजी पुतळा, मानेवाडा चौक, शताब्दी चौक यासारख्या अनेक ठिकाणी असे बेघर व विमनस्क नागरिक दिसतात. ते देखील उद्या करोनावाहक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

………Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

farmers protest: farmers protest : शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! कृषी कायद्यांची अंमलबजावणी रोखण्याचा प्रस्ताव – farmers protest farm laws talks between farmer unions and the...

नवी दिल्लीः नवीन कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) आंदोलन ( farmers protest ) करणाऱ्या शेतकरी संघटनांसमोर ( farmer unions ) अखेर सरकार...

Recent Comments