Home मनोरंजन राजकुमार राव: अखेर आला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर -...

राजकुमार राव: अखेर आला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या ‘छलांग’चा ट्रेलर – rajkummar rao and nushrat bharuch starrer chhalaang official trailer


मुंबई- राजकुमार राव आणि नुसरत भरुच यांच्या आगामी ‘छलांग’ सिनेमाची बर्‍याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हा एक विनोदीपट असून हरियाणाच्या ग्रामीण पाश्वभूमीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमात राजकुमार राव एका शाळेचा पीटी शिक्षक दाखवण्यात आला आहे. तर नुसरत त्याच शाळेतील संगणक शिक्षिकेची भूमिका साकारत आहे.

‘छलांग’ सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात फारच मजेशीर आहे. ट्रेलरवरूनच हा सिनेमा भरभरून मनोरंजन करणारा असेल याचा अंदाज येतो. ट्रेलरमध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरूचासोबत झीशान अयूबचा अभिनयही भारदस्त आहे. एवढंच नाही तर या सिनेमाचं विशेष आकर्षण असेल ते म्हणजे सौरभ शुक्ला, सतीश कौशिक आणि इला अरुण. या तीनही कलाकारांच्याही भूमिका सिनेमात उठावदार असतील यात काही शंका नाही. इथे पाहा सिनेमाचा ट्रेलर :

या सिनेमाचं दिग्दर्शन शाहिद, सिटीलाइट्स, अलिगड, सिमरन आणि ओमेर्ता सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांचं दिग्दर्शन केलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलं आहे. ‘छलांग’ ची कथा लव्ह रंजन, असीम अरोरा आणि झीशान कादरी यांनी लिहिली आहे. तर सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, लव रंजन आणि अजय देवगन यांनी केली आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा १३ नोव्हेंबर २०२० रोजी ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mid Range Smartphone: मिड-रेंज स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट, अॅमेझॉन सेलमध्ये बेस्ट डील – amazon great indian sale offer: best deals on vivo y30 to...

नवी दिल्लीः अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये टॉप कंपन्यांच्या बेस्ट स्मार्टफोन्सवर जबरदस्त डील आणि डिस्काउंट सोबत मिळत आहे. सध्या मिड रेंजच्या स्मार्टफोनची डिमांड खूप...

रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला चिरडले ट्रकने

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीवरील दाम्पत्य ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच पडल्याची घटना घटना जेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी सकाळी अकराला...

Recent Comments