Home ताज्या बातम्या राज्याला पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची गरज, उद्धव ठाकरेंनी धुडकावली भाजपची मागणी | Coronavirus-latest-news

राज्याला पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची गरज, उद्धव ठाकरेंनी धुडकावली भाजपची मागणी | Coronavirus-latest-news


राज्यावर मोठं संकट कोसळलं असताना विरोधी पक्ष असलेला भाजप राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे.

मुंबई, 24 मे: राज्यात कोरोनाचा गुणाकार सुरु झाला आहे. आगामी काळात कोरोनाचा धोका आणखी वाढणार आहे. पण घाबरु नका, कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत.

हेही वाचा.. Maharashtra Breaking: राज्यात गेल्या 24 तासांत 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्या होत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. राज्यात सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पोकळ घोषणा करणारं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला विशेष पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची सध्या गरज असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पॅकेजची मागणी धुडकावून लावली.

मुख्यमंत्र्यानी सांगितलं की, सर्व परप्रांतीय मजुरांची योग्य ती व्यवस्था करण्यात आली. मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतले नाही. केंद्राची वाट न बघता राज्याने खर्च केला, असा भाजपला टोला लगावला. इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा सांगितलं नाही. त्यांना घरी जायचं होतं, यासाठी आपण  केंद्राकडे परवानगी मागितली पण तेव्हा मिळाली नाही. आता कोरोनाचं संकट वाढल्यानंतर ही परवानगी मिळाली. राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन सोडल्या. यातून 7 लाखापर्यंत मजूर आपापल्या गावी पोहोचले. राज्य सरकारने 75 कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्यानं मजूर निघाले होते. एसटीने रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना स्थानकापर्यंत तसेच परराज्यापर्यंत सोडण्यात आले. 5 ते 23 मेपर्यंत एसटीच्या सुमारे 32 हजार फेऱ्या झाल्या. यामध्ये एसटीच्या माध्यमातून जवळपास 4 लाख मजुरांना जवळचं स्थानक तसेच घरापर्यंत सोडण्यात आलं. याकामात राज्य सरकारने 75 कोटी खर्च केला आहे.

हेही वाचा…मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

दरम्यान, राज्यावर मोठं संकट कोसळलं असताना विरोधी पक्ष असलेला भाजप  राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे. राज्यपालांकडे तक्रार करत आहे, अशा दुहेरी आव्हानांचा मुख्यमंत्री सध्या सामना करत आहेत.

Tags:

First Published: May 24, 2020 02:26 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Mahesh Manjrekar: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात शिवीगाळ व दमदाटीची तक्रार – pune: yavat police registered non cognizible offence against actor director mahesh manjrekar

म. टा. वृत्तसेवा । दौंड पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला एका कारने पाठीमागून धडक दिल्यानं संतापलेल्या...

Recent Comments