Home ताज्या बातम्या रात्री झोप लागत नाही? झोपण्याच्या तासाभरापूर्वी फक्त ही एक गोष्ट करा bathing...

रात्री झोप लागत नाही? झोपण्याच्या तासाभरापूर्वी फक्त ही एक गोष्ट करा bathing before one hour with hot water improved sleep quality day study | News


नीट झोप (sleep) लागण्यासाठी शरीराचं हे तापमान नीट नियंत्रित करणं गरजेचं आहे.

ऑस्टिन, 11 जून : अनेकांना रात्री लवकर झोप (sleep) लागत नाही. किती तरी वेळ ते बेडवर असेच पडून असतात, झोपण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हालादेखील अशीच समस्या असेल तर त्यावर मार्ग म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणं.

एका अभ्यासानुसार झोपण्याआधी योग्य तापमान (temperature) असलेल्या पाण्याने योग्य वेळेत अंघोळ (bath) केली, तर चांगली आणि शांत झोप लागते.

युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधकांनी पाण्यामुळे शरीराच्या तापमानावर होणा-या परिणामाचा झोपेच्या समस्येवर काय परिणाम होतो याबाबत झालेल्या संशोधनाचा अभ्यास केला. स्लीप मेडिसीनमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हे वाचा – Sleep talking : काही व्यक्ती झोपेत का बडबडतात?

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, या अभ्यासात असं संशोधकांनी चांगली झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी 1 ते 2 तास आधी अंघोळ करावी.

अंघोळीसाठी असलेल्या पाण्याचं तापमान 40 ते 43°C इतकं असावं, असं साांगितलं.

शास्त्रज्ञांच्या मते, झोप आणि शरीराचं तापमान हे सिक्रेडियन क्लॉकनुसार असतं. त्यामुळे शरीराच्या तापमानामुळेही झोपेवर परिणाम होतो.

हे वाचा – रात्री झोपताना BRA घालणं योग्य नाही; होऊ शकतात असे दुष्परिणाम

सामान्यपणे रात्री शरीराचं तापमान कमी होतं. मध्यरात्री ते आणखी कमी होतं आणि त्यानंतर ते हळूहळू वाढू लागतं. जे शरीराचं नैसर्गिक अलार्म म्हणून काम करतं आणि आपल्याला झोपेतून उठण्याचे संकेत देतं.

त्यामुळे नीट झोप लागण्यासाठी शरीराचं हे तापमान नीट नियंत्रित करणं गरजेचं आहे.

गरम पाण्याचा शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. रक्ताभिसरण वाढतं आणि शरीरातील उष्णता बाहेर पडून शरीराचं तापमान कमी होतं. ज्यामुळे लवकर आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

संकलन, संपादन- प्रिया लाड

हे वाचा – गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?

First Published: Jun 11, 2020 09:46 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments