Home मनोरंजन रिया चक्रवर्ती सुशांत केस: डाव फिरला! अंकिता लोखंडेविरोधात कायदेशीर कारवाई करणार रिया...

रिया चक्रवर्ती सुशांत केस: डाव फिरला! अंकिता लोखंडेविरोधात कायदेशीर कारवाई करणार रिया चक्रवर्ती? – reports claims rhea chakraborty may take legal action against ankita lokhande


मुंबई- अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीची काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला तिचा तीन वेळा जामिन अर्ज फेटाळला होता. मात्र या दरम्यानच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेटशी संबंधित तिच्या विरोधातला कोणताही पुरावा सापडला नसल्यामुळे तिला जामिन मंजूर करण्यात आला.

रियाला जामिन मिळाल्यावर तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी स्पष्ट केलं की, ज्यांनी रियाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांविरोधात ती कायदेशीर कारवाई करेल. या स्पष्टीकरणानंतर रिया आता सुशांतसिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेविरूद्ध कायदेशीर कारवाई करेल अशी चर्चा होत आहे.

अखेर आला राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या ‘छलांग’चा ट्रेलर

निव्वळ अफवा असू शकते ही चर्चा

असं असलं तरी रिया चक्रवर्ती किंवा तिच्या वकिलांनी या संबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच या प्रकरणात अंकिता लोखंडेनेही कधी कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे या चर्चा फक्त अफवाही असू शकतात असं म्हटलं जात आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांच्या एफआयआरनंतर अंकिताने तिचा पाठिंबा सुशांतच्या घरच्यांना दिला होता. लोखंडे सुशांत प्रकरणाबद्दल खूप बोलले होते. त्याने रियाविरोधात बरीच विधाने केली आहेत.

अंकिताने केले होते रियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित

अंकिताने ‘टाइम्स नाऊ’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की सुशांतने ‘मणिकर्णिका’च्या शूटिंग दरम्यान तिला अभिनंदनाचा मेसेज केला होता. यावेळी सुशांतने तो रियामुळे खासगी आयुष्यात खूप अस्वस्थ असल्याचं अंकिताला सांगितल्याचं ती म्हणाली. इतकंच नाही तर अंकिताने रियावर निशाणा साधला प्रश्न केला होता की जर तुमचं एखाद्यावर अतोनात प्रेम असतं आणि तुम्हाला त्याच्या आजाराबद्दल माहीत असतं तरीही तुम्ही त्याला ड्रग्ज कसे देऊ शकता.

आदिनाथ कोठारेने सांगितला करोना काळातला घरातील कठीण प्रसंग

अंकिताने रियाच्या अटकेला म्हटलं ‘कर्म’

ड्रग्ज प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आले तेव्हा अंकिताने ट्वीट करत याला कर्म म्हटलं होतं. आपण आपल्या कर्मातून आपलं भविष्य घडवत असतो. हेच कर्म असतं.. सुशांतची तब्येत खराब होती हे जेव्हा रियाला माहीत होतं तेव्हा तिने त्याच्या घरच्यांना का सांगितलं नाही असा प्रश्नही अंकिताने विचारला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad: Aurangabad: तरुणाची हत्या करून व्हिडिओ पत्नीच्या मोबाइलवर पाठवला – aurangabad 35 year old man murdered and video sent on wife mobile

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर: रांजणगाव शेणपुंजी येथे एका ३५ वर्षांच्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना बुधवार २१ ऑक्टोबर रोजी...

Gujarat: Gujarat: पोलिसाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल – gujarat policeman beaten in ahmedabad

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मंगळवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. पोलिसावर...

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी अमित शहांना दिली ‘ही’ उपमा – amruta fadnavis wishes union home minister amit shah on his birthday

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपच्या नेत्यांनी सकाळपासून सोशल मीडियावर शहांचे अभिष्टचिंतन सुरू...

Recent Comments