Home ताज्या बातम्या रुग्णवाढीबरोबर पुण्यात कंटेन्मेंट झोनही वाढले, वाचा पूर्ण यादी | Pune

रुग्णवाढीबरोबर पुण्यात कंटेन्मेंट झोनही वाढले, वाचा पूर्ण यादी | Pune


फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन झाले आहेत. त्याचे एकूण क्षेञफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे.

पुणे 1 जुलै:  पुण्यातील कोरोना मायक्रोझोनची पुन्हा नव्याने फेरचना जाहीर झाली आहे. पुण्यात याआधी 74 कोरोना प्रतिबंधित झोन होते त्यापैकी 15 मायक्रोझोन कोरोनामुक्त बनल्याने नवीन आदेशातून त्यांची नावं वगळली तर गेल्या 15 दिवसात तब्बल 50 नवे झोन कोरोना बाधित बनलेत तर 9 मायक्रोझोनची फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन झाले आहेत. त्याचे एकूण क्षेञफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला ही माहिती दिली.

पुण्यात 877  रुग्णांची वाढ झाली. एका दिवसांमधली सर्वात जास्त वाढ आहे. तर आज 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 18105 एवढी झाली आहे.

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत केवळ धार्मिक स्थळांना काही अटींसह सूट देण्यात आली आहे. कलम 144 चे आदेश जारी करण्याबरोबरच पोलीस आयुक्त प्रणय अशोक म्हणाले की, या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 लागू केले जात असल्याचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी लोकांच्या गर्दीवर बंदी असेल. ते म्हणाले की, विशिष्ट नियमांचे पालन करून धार्मिक स्थळांना सूट देण्यात आली आहे.

संपादन – अजय कौटिकवार

 

First Published: Jul 1, 2020 10:47 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments