Home महाराष्ट्र रुग्णवाढ रोखण्यासाठी आता औरंगाबादेत ‘केरळ पॅटर्न’

रुग्णवाढ रोखण्यासाठी आता औरंगाबादेत ‘केरळ पॅटर्न’म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढत होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी औरंगाबाद शहरात ” राबवला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. ‘केरळ पॅटर’नची अंमलबजावणी तातडीने अंमलबजावमी सुरू केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

‘लॉकडाऊन’ शिथिल केल्यानंतर प्रामुख्याने आठ जूनपासून औरंगाबाद शहरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दररोज ९० ते १२० यादरम्यान नवे रुग्ण आढळत आहेत. याबद्दल पत्रकारांनी प्रशासक पांडेय यांना विचारले असता ते म्हणाले, ‘लॉकडाऊननंतर रुग्ण संख्या वाढू न देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यांनी सुरक्षित वावरणे, मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे हे नियम पाळले तर रुग्णांची संख्या वाढणार नाही. काही खासगी संस्थांच्या माध्यमातून विविध शहरातील संभाव्य रुग्ण संख्येबद्दल सर्वेक्षण करून अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबाद शहरात नऊ जूनपर्यंत २१ हजार रुग्ण होतील, असा अंदाज होता, परंतु सध्या औरंगाबादमध्ये रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. रुग्ण संख्या वाढू न देण्यात महापालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे.’

महापालिकेने २० मेपर्यंत ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’चे प्रमाण वाढवले होते. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य झाले. करोनाबाधित एखादा व्यक्ती आढळून आल्यावर त्याच्या घरातील सर्वांना व त्याच्या निकट संपर्कातील (क्लोज कॉन्टक्ट) व्यक्तींना शोधून त्यांना ‘क्वारंटाइन’ केले जात होते. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांचे लाळेचे नुमने घेतले जात होते. नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात होते. उर्वरितांना काही दिवस ‘क्वारंटाइन सेंटर’मध्येच ठेवले जायचे. आता पुन्हा तीच पद्धत अवलंबली जाणार आहे, असे प्रशासक पांडेय यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये ही पद्धत प्रभावीपणे राबवली गेली. ‘ट्रेस, आयसोलेट, टेस्ट, ट्रीट’ या चतुःसूत्रीवर ही पद्धत आधारित आहे. मुंबईत ‘ट्रेस, टेस्ट, आयसोलेट’ ही पद्धत अवलंबली जात आहे, असे त्यांनी सांगितले. ‘क्वारंटाइन’चे प्रमाण वाढवून रुग्णसंख्येला आळा घातला जाईल, असे पांडेय यांनी स्पष्ट केले.

११८ मंगल कार्यालये ताब्यात घेणार

‘क्वारंटाइन’चे प्रमाण वाढवल्यावर संबंधित व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाटी ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये चार हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजार ‘क्वारंटाइन बेड’ आहेत, अशी माहिती देताना आस्तिककुमार पांडेय म्हणाले, ‘भविष्यात ‘क्वारंटाइन’ करणयात येणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढलीच तर, निवासाची व्यवस्था अपुरी पडू नये म्हणून महापालिकेच्या नऊ झोनच्या कार्यक्षेत्रातील ११८ मंगल कारयालये ताब्यात घेतली जाणार आहेत. त्यासंदर्भातील ‘फाइल’वर आजच आपण स्वाक्षरी केली आहे. दहा हजार खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. रोज एक हजार जणांना ‘क्वारंटाइन’ करावे लागले तरी, दहाव्या दिवशी पहिल्या दिवशी ‘क्वारंटाइन’ केलेल्यांना घरी सोडता येईल. दुसऱ्या दिवशी दुसरे एक हजार नागरिक सोडले जातील.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

International Women’s Day 2021: घरखरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर – 82 percent of women prefer to buy house for investment : anarock survey

म. टा. प्रतिनिधी, मुंबईविविध प्रकारच्या सवलतींच्या लाटेवर असलेल्या घरखरेदीचा आलेख मुंबईत सध्या चढता आहे. विशेष म्हणजे, घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिथे...

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

Recent Comments