Home मनोरंजन रेणुका शहाणेची मदत: अभिनेत्रीकडे नाहीत आईच्या उपचारांसाठीचे पैसे, रेणुका शहाणेने केलं मदतीचं...

रेणुका शहाणेची मदत: अभिनेत्रीकडे नाहीत आईच्या उपचारांसाठीचे पैसे, रेणुका शहाणेने केलं मदतीचं आवाहन – renuka shahane actress nupur alankar facing financial crunch


मुंबई- करोना महामारीमुळे अनेकांच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं आहे. दोन महिन्यांपासून लांबलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. ‘स्वरागिनी’ मालिकेतील अभिनेत्री नूपुर अलंकारलाही पैशांची चणचण आता जाणवू लागली आहे.

गेल्यावर्षी बँकेत अडकला पैसा

नूपुरने आतापर्यंत ‘स्वरागिनी’, ‘तंत्र’, ‘इस प्यार को क्या नाम दूं एक बार फिर’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. गेल्यावर्षी पुणे अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात तिचे जमा केलेले पैसे बुडाले. तेव्हापासून ती आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आता तिला आजारी आईला इस्पितळात भरती करायचे आहे. पण तिच्याजवळ पैसे नसल्यामुळे ती आईला योग्य उपचार देऊ शकत नाही. अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी फेसबुकवर नूपुर यांच्या बँकेची माहिती देत लोकांना तिला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

अक्षय कुमारकडे आहेत या ५ महागड्या गोष्टी

रेणुका यांनी फेसबुकवर शेअर केली पोस्ट

पोस्टमध्ये रेणुका यांनी लिहिले की, ‘माझी फार चांगली मैत्रीण नूपुर अलंकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. तिचा सगळा पैसा पीएमसी बँकेत अडकला आहे. नूपुरने अभिनयातून जो पैसा कमावला तो तिने आईच्या उपचारांसाठी खर्च केला. लॉकडाउनमुळे ते कामही थांबलं आहे. आता तिच्या आईला इस्पितळात दाखल करायचं आहे. यासाठी पैशांची गरज आहे. मी तिच्या आईच्या बँकेची माहिती देते. तुम्ही जी काही मदत करू शकता ती नक्की करा.’

सहकाऱ्यांकडून उधार घेतले पैसे

नूपुरने रेणुकाच्या मदतीसाठी तिचे आभार मानले. याशिवाय खर्च चालवण्यासाठी तिने सहकाऱ्यांकडून पैसे उधार घेतले होते आणि आपले दागिनेही विकले होते. जेव्हापासून तिचं अकाउंट बंद झालं आहे तेव्हापासून तिच्यावर आर्थिक संकट आलेलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

television news News : कपिल शर्मानं मौन सोडलं;पडद्यावरच्या ‘भीष्म पितामह’यांना दिलं ‘हे’ उत्तर – kapil sharma finally responds to mukesh khanna’s attack on his...

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अश्लिल भाषेचा वापर करत हुल्लडबाजी सुरु असते , अशी टीका अभिनेते मुकेश खन्ना यांनी...

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Recent Comments