Home शहरं नाशिक रेशनगच्या तांदळाचा काळाबाजार

रेशनगच्या तांदळाचा काळाबाजार


म.टा.वृत्तसेवा,

मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे-कौळाणे रस्त्यावरील शेडजवळ स्वस्त धान्य दुकानातील धान्याची साठवणूक करून वाहतूक करणाऱ्या ११ जणांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत २ लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचा १३९ गोणी तांदूळ जप्त केला. यातील ४ आरोपी फरार झाले, तर उर्वरित ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी रणजित रामाघरे यांनी रविवारी (दि.२८) सायंकाळी ही कारवाई केली. कौळाणे रस्त्यालगत असलेल्या नरेंद्र भगवान शेवाळे याच्या शेडजवळ एका पिकअप (ए एच ०२ वा ए ६८६०) मध्ये स्वस्त धान्य दुकानातील २ लाख २२ हजार ४०० रुपये किमतीचा १३९ गोणी तांदूळ विक्री करण्यात आला. यावेळी मोहम्मद गुरफान अब्दुल सुभान (वय ६५, रा. रजापुरा), शीतल सुभाषचंद्र लोहाडे (वय ४५ रा.सावता नगर, संगमेश्वर), अब्दुल इसाक सत्तार (वय ३२, रा.महेवी नगर), शेख बुरहान बुडण ( वय ५० रा.गवळीवाडा), शेख ईसार इसाक (वय ३०रा.देवीचा मळा), फारुख रमजान खान (वय ३५, हुडको कॉलनी), सय्यद जाफर सलीम (वय २५ रा.गवळीवाडा) हे सातही जण आढळून आले. यातील आरोपी निसार शेख (रा.बजरंग वाडी), जाफर शेठ (रा. आयेशा नगर), नरेन्द्र शेवाळे व कुंदन केदार (पिक अप मालक रा.कॅम्प) हे चारही जण फरार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

All India Marathi Literary Meet: आज ठरणार संमेलनाध्यक्ष – today will be decide the president of the 94 th all india marathi literary meet

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकनाशिकमध्ये होऊ घातलेले ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून, २६ ते २८ मार्चदरम्यान...

India vs England: IND vs ENG : भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मिळू शकते सरप्राइज गिफ्ट – ind vs eng : in india...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय चाहत्यांसाठी काही दिवसांत एक आनंदाची बातमी येऊ शकते. कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय चाहत्यांना एक आनंदाची बातमी...

Recent Comments