Home शहरं मुंबई रेशनचा मार्ग मोकळा

रेशनचा मार्ग मोकळालॉकडाउनच्या काळात दिलासा

प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक

कोणत्याही वितरकाकडून धान्य घेता येणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

विविध राज्यांतील रेशन कार्ड एकाच पोर्टलखाली आणून देशात कोठेही रेशनद्वारे धान्य मिळण्याबाबत केंद्र सरकारने यापूर्वीच लागू केलेली सुविधा लॉकडाउनच्या काळात विशेष उपयुक्त ठरत आहे. संचारबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या इतर राज्यांतील, जिल्ह्यांतील वा विभागांतील सामान्य नागरिकांना ”ऑनलाइन पोर्टेबिलिटी” सुविधेच्या माध्यमातून जवळच्या रेशन दुकानांतून धान्य घेता येणार आहे. यासाठी रेशन कार्डाची ऑनलाइन प्रक्रिया (आधारकार्ड लिंक, अंगठ्याचा शिक्का घेऊन प्रमाणित करणे इ.) पूर्ण झालेली असणे आवश्यक असल्याचे सहाय्यक शिधावाटप आयुक्त कैलास पगारे यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले. या सुविधेमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात अचानक संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी, देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत रोजगारासाठी आलेली अनेक सामान्य कुटुंबे अडकून पडली आहेत. या कुटुंबांना, त्यांचे रेशन कार्ड मूळगावी राहिल्याने आपल्या हक्काचे स्वस्त धान्य (रेशनिंग) मिळवताना अडचणी येत आहेत. या कुटुंबांची गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेच्या निवारा केंद्रांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र अशा कुटुंबांच्या शिधापत्रिकेची नोंद नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनईसी) पोर्टलमध्ये असल्यास त्यांना शिधावाटप कार्यालयाच्या ऑनलाइन पोर्टेबिलीटी या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी या कुटुंबांची मूळ रेशनिंग वितरकाकडील ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झालेली असायला हवी. या सुविधेंतर्गत आपल्या जवळील स्वस्त धान्याच्या दुकानात जाऊन सांगितलेल्या आधारकार्ड क्रमांक किंवा शिधापत्रिका क्रमांकाची नोंद एनईसी पोर्टलमध्ये सापडणे आवश्यक आहे. त्यानंतर केवळ इतर जिल्ह्यांतीलच नाहीतर शेजारी राज्यांतील नागरिकांनादेखील हक्काचे धान्य घेता येणार आहे.

”शासनातर्फे पूर्वीपासूनच ही सुविधा देण्यात येत असून संचारबंदीच्या काळात या सुविधेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनईसी) पोर्टलमध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांची ऑनलाइन नोंद करण्यात आली आहे. या महापोर्टलला सध्या १२ राज्यांचे पोर्टल जोडण्यात आले आहेत. त्यामुळे इतर राज्यातील नागरिकही रेशन कार्ड नसतानाही केवळ आधारकार्ड किंवा शिधापत्रिका क्रमांक सांगून धान्य घेऊ शकतो” असे पगारे यांनी सांगितले.

…मात्र मोफत तांदूळ नाही!

केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पात्र असलेल्या असलेल्या शिधापत्रिका धारकांना पुढील तीन महिन्यांपर्यंत ठरवून दिलेल्या शिधेसह अतिरिक्त ५ किलो मोफत तांदूळ मिळणार आहे. ही शासनाची विशेष योजना असून ऑफलाइन पद्धतीने या तांदळाचे वितरण होत आहे. त्यामुळे ऑनलाइन पोर्टेबिलिटी सुविधेंतर्गत धान्य घेणाऱ्या नागरिकांना मोफत तांदूळ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sangli crime: Sangli Crime: उपचारांसाठी डॉक्टरकडे गेला; दवाखाना बंद असल्याचे पाहून काय केलं पाहा! – sangli crime theft in doctors house accused arrested in...

सांगली:शिराळा तालुक्यातील मांगले येथील गंधा नर्सिंग होममध्ये उपचारासाठी गेलेल्या चोरट्याने दवाखाना बंद असल्याचे पाहून दवाखान्यालगत असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरी केली. हा धक्कादायक प्रकार...

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Recent Comments