Home ताज्या बातम्या लग्नासाठी साठवले होते 2 लाख, लॉकडाऊनमध्ये गरजूंना केली अशी मदत coronavirus 2...

लग्नासाठी साठवले होते 2 लाख, लॉकडाऊनमध्ये गरजूंना केली अशी मदत coronavirus 2 lakh was saved for marriage auto driver help to workers in lockdown mhkk | Coronavirus-latest-news


30 वर्षांच्या अक्षय कोठावळे या तरुणानं अनोखं कोरोनाच्या महासंकटात एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

ठाणे, 19 मे : मदत करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही प्रकारची मदत निस्वार्थी आणि फायदा न पाहाता केली जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. एका रिक्षा चालकानं आपल्या लग्नासाठी साठवलेले 2 लाख रुपये कोरोनाच्या महासंकटात गरजूंच्या मदतीसाठी वापरले आहेत. हे पैसे त्यानं आपलं लग्न चांगल्या पद्धतीनं कऱण्यासाठी साठवले होते. मात्र कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊन सुरू झाला. या लॉकडाऊनमुळे त्याचं लग्न होऊ शकलं नाही पण तरुणानं ते 2 लाख रुपये अनोख्या पद्धतीनं मदत करत गरजूंना वापरले आहेत.

30 वर्षांच्या अक्षय कोठावळे या तरुणानं अनोखं कोरोनाच्या महासंकटात एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. लग्नासाठी साठवलेले पैशातून अक्षय गरीब, मजूर आणि वृद्ध-गर्भवती महिलांची मदत करत आहे. याशिवाय वृद्ध रूग्ण आणि गर्भवती महिलांना विनाशुल्क रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करत आहे. 25 मे रोजी अक्षयच्या लग्नाची तारीख ठरली होती त्यासाठी त्यानं पैसेही साठवले पण लॉकडाऊन वाढल्यानं विवाह तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा-आजपासून पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट बंद, कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्णय

”मी लोकांना रस्त्यावर हालाकीचं जीवन काढताना पाहिलं. त्यांना नीट अन्नही मिळत नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठी त्यांची केवीलवाणी धडपड मला दिसत होती. हे दृश्यं पाहून मी मनातून हादरून गेलो आणि काही मित्राच्या सोबतीनं मी या लोकांची मदत कऱण्याचा निर्णय घेतला.”

अक्षय ठाण्यातील टिंबर बाजार इथे राहातो. त्यानं आपल्या मित्रांची मदत घेऊन भुकेलेल्यांना पोळी-भाजी वाटण्याचं काम सुरू केलं. याशिवाय मजूर आणि गरजूंना खायला देण्याची मदत केली आणि वृद्ध आणि गर्भवतींना आपल्या रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्यासाठी. त्याला या कामात मित्रांचं सहकार्य लाभल्याचं अक्षयनं सांगितलं. त्याच्या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक केलं जात आहे.

हे वाचा-वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: May 19, 2020 09:30 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE: नाकावाटे दिली जाणार कोरोना लस, नागपूरसह देशभरात 4 ठिकाणी चाचणी सुरू | Coronavirus-latest-news

7:36 am (IST) कोरोना लस आता नाकावाटे देण्याबाबत देशात चार ठिकाणी चाचणी सुरू राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटल मध्ये चाचणी...

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Recent Comments