Home संपादकीय लसीकरणाची गती वाढवा

लसीकरणाची गती वाढवा


कोव्हिडच्या रुग्णांचा आलेख पुन्हा उंचावू लागल्याने लसीकरणाची गती वाढविणे आवश्यक बनले आहे. लसीकरण सुरू केल्यानंतर जेमतेम महिन्याभरात भारताने एक कोटी जणांना लस देण्यात यश मिळविले असले, तरी पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. कोव्हिडच्या विरोधात उपाययोजनांत आरोग्य आणि प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी आघाडीवर असून, त्यांपैकी तीन कोटींना लस देण्याचा हा टप्पा, सध्याच्या गतीने पूर्ण होण्यास आणखी दोन महिने लागू शकतात. लसीकरणात अमेरिका (५.५२ कोटी) आणि (१.६१ कोटी) या दोन देशांनंतर भारताचा क्रमांक लागत असला, तरी आपली लोकसंख्या पाहता अशी तुलना योग्य नाही. ब्रिटनमध्ये तीन प्रौढांपैकी एकाला लस दिली जात आहे. १३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वांचे सोडा; परंतु एक चतुर्थांश लोकांचे लसीकरणासाठीही मोठा कालावधी लागणार आहे. करोना विषाणूत होत असलेल्या बदलामुळे आणि संभाव्य लाटेमुळे धोका तर कायम आहे. रात्रीची संचारबंदी, विशिष्ट भागांत टाळेबंदी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित वावराची काटेकोर अंमलबजावणी आदींद्वारे काही प्रमाणात संसर्ग रोखला जातो हे खरे; परंतु लसीकरणामुळे आश्वासकता येऊ शकते. त्यामुळेच वेगाने लसीकरण व्हायला हवे. यासाठी खासगी क्षेत्राची मदत घेण्याची यांच्यासारख्या उद्योगपतींनी केलेली सूचना स्वागतार्ह आहे. करोनाची साथ सुरू झाल्यानंतर देशात सुरुवातीच्या टप्प्यात अत्यल्प स्वरूपात चाचण्या होत होत्या. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी घेणे गरजेचे बनल्यानंतर चाचण्या वाढविणे आवश्यक बनल्या. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यानंतर चाचण्यांची संख्या वाढत गेली. लसीकरणाचेही असे करता येऊ शकते. खासगी रुग्णालये आणि आस्थापना यांची मदत घेतल्यास साठ दिवसांत ५० कोटी लोकांचे लसीकरण होऊ शकते, हा प्रेमजी यांनी केलेला दावा अगदीच चुकीचा नाही. तीस कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे सरकारने जाहीर केले आहे; परंतु तो पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा काळ लागू शकतो. या योजनेच्या जोडीनेच खासगी क्षेत्रात तीनशे ते चारशे रुपये दरात लस उपलब्ध करून दिल्यास लसीकरणाचे सार्वत्रीकरण होऊ शकेल. लसीकरणात खासगी क्षेत्राला सहभागी करून घेण्याचा निर्णय लवकर घेण्याचे आश्वासन निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिले असले, तरी याबाबत त्वरित निर्णय होणे कोव्हिड प्रतिबंधक समाजासाठी गरजेचे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Recent Comments