Home देश लालूंनी रिम्समध्ये कापला वाढदिवसाचा केक; तेजस्वींना मारली मिठी

लालूंनी रिम्समध्ये कापला वाढदिवसाचा केक; तेजस्वींना मारली मिठी


रांची: राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख यांचा आज (गुरुवार) ७३वा साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांचे पुत्र आणि पक्षाची जबाबदारी सांभाळणारे रांचीमधील रिम्स येथे पोहोचले. येथे वडील आणि पुत्राची भेट झाली. आपला पुत्र तेजस्वी यांना पाहून लालूप्रसाद खूप आनंदीत झाले. त्यांनी पुत्राला छातीशी घट्ट धरले. त्यावेळी यावेळी लालूंच्या चेहऱ्यावरचे हास्य उठून दिसत होते. लालूप्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रिम्स रुग्णालयात दाखल आहेत.

लालूंच्या वाढदिवशी गरिबांसाठी खीर-पुरी आणि बूंदी
लालू प्रसाद यादव यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त, रिम्समध्ये शारीरिक अंतराचे पालन करत गरीब नागरिकांसोबत ७३ पौंडांचा केक देखील कापण्यात आला. त्याचवेळी गरीबांना, खीर, भाजीपाला व बुंदीचे वाटप करण्यात आले. आज सकाळपासून आरजेडीचे कार्यकर्ते लालूंच्या वाढदिवसानिमित्त सक्रिय झालेले दिसले. लालू प्रसाद यादव यांच्या ७३ व्या वाढदिवशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

राबडी देवींनी दिल्या शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडी देवी यांनी लालूप्रसाद यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लालूप्रसाद यादव यांना पाठवलेल्या अभिनंदन संदेशात त्या म्हणतात, ‘वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. देवाची कृपा प्रत्येक क्षणी तुमच्यावर असो. कारस्थान्यांनी भगवान श्रीकृष्णालाही तुरुंगातही पाठवले होते. आपण निरोगी रहा आणि गरिबांच्या सन्मान आणि हक्कांसाठी संघर्ष करत रहा, ही परम प्रार्थना आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.’

तेजस्वी म्हणाले की…

जेव्हा जेव्हा आपण पिता लालूप्रसाद यादव यांच्या जीवनयात्रेवर कटाक्ष टाकतो तेव्हा तो प्रवास अद्भूत आणि विरळ असल्याचे मला जाणवते, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. त्यांनी विषमतेविरुद्ध लढाई केली, गरिबांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. कधी गुडघे टेकले नाहीत. कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. ते आजही न थकता, न झुकता लढत आहेत, असे तेजस्वी म्हणाले.

बिहारच्या लोकांच्या हक्कासाठीच्या त्यांच्या या लढाईत मी देखील भागीदार झालो आहे, याचा मला अभिमान आहे, असेही तेजस्वी म्हणाले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी वचन देतो की बिहारच्या तरूण आणि गरीबांना सर्व परिस्थितीत न्याय दिला जाईल. नितीश सरकारने १५ वर्षे राज्य करत असताना इतरांवर खापर फोडले आहे. राज्यात उपासमार, गुन्हेगारी आणि अव्यवस्थेमुळे कुणाचाही मी जीव जाऊ देणार नाही. आज, वडिलांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही ७३००० गरीबांना खायला घालू, त्यांच्या जीवनातील चिंता दूर करू आणि मग वडिलांच्या प्रेरणेने बिहारला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढू, असा संकल्प तेजस्वी यादव यांनी केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments