Home ताज्या बातम्या 'लुडोला दिली ओसरी...' सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोची काय आहे भानगड! subodh...

‘लुडोला दिली ओसरी…’ सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोची काय आहे भानगड! subodh bhave share photo on instagram while playing ludo with his sons | News


सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण टाइमपास म्हणून लुडो खेळताना दिसत आहेत. अशात सुबोधनं शेअर केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई, 4 मे : मराठी अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुबोध सुद्धा त्याच्या फॅमिली सोबत टाईम स्पेन्ड करत आहे. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर लॉकडाऊनमधले मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. सुबोधनं नुकताच एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याच्या अतरंगी कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सुबोध सध्या लॉकडाऊनचा पूर्ण काळ त्याच्या फॅमिलीला देत आहे. त्याच्या मुलांसोबत वेगवेगळे खेळत आहे. त्यांच्याशी गप्पा मारत आहे. त्यांना नव्या गोष्टी शिकवत आहे. पण त्यानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिलं, ‘लुडोला दिली ओसरी लुडो हातपाय पसरी.’

‘माझ्या गर्लफ्रेंडशी फ्लर्ट केलंस तर..’ अनुष्काच्या फॅनला अभिनेत्यानं दिली धमकी

सुबोधनं यासोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा मल्हार आणि कान्हा जमिनीवर झोपून लुडो खेळताना दिसत आहे आणि हा लुडो साधा लुडो नाही. तर भावे फॅमिलीनं संपूर्ण चादरीवरच लुडो बोर्ड बनवला आहे. सुबोधनं शेअर केलेल्या या फोटोवर अनेक मराठी स्टर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी यावर विनोदी कमेंट केल्या आहेत.

सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण टाइमपास म्हणून लुडो खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तर यावर अनेक मीम्स सुद्धा तयार करण्यात आले होते. ज्यात लुडोला जागतिक खेळाचा दर्जा द्यावा असं विनोदानं म्हणण्यात आलं होतं. त्यात आता सुबोधनं असा फोटो शेअर करत अधिकच रंगत आणली आहे.

(संपादन- मेघा जेठे.)

श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

हृतिक रोशन कापणार होता हाताचं सहावं बोट, ऑपरेशनची तयारी सुद्धा झाली, पण…

First Published: May 4, 2020 09:27 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments