Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल लॉकडाउनच्या काळात गेमिंगमध्येही धोका!

लॉकडाउनच्या काळात गेमिंगमध्येही धोका!


Niraj.Pandit@timesgroup.com

@nirajcapditMT

टप्प्याटप्प्यानं उठत असलं तरी शाळा, कॉलेजांबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्यानं मुलांचा गेमिंगमधील वेळ वाढू लागला आहे. ७३ टक्के मुलं शुटिंग आणि अॅडव्हेंचर गेम्सला पसंती देत असल्याचं पाहणीत समोर आलं आहे. तर सुमारे ८७ टक्के गेमर्सना जास्त गेम्स खेळल्यानं वागण्यात बदल होत असल्याचं मान्य केलं आहे. पण, ऑनलाइन गेमिंगमध्ये मजा आहे, तसेच त्यात धोकेही आहेत. तुमची आणि तुमच्या मुलांची ऑनलाइन ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी काही नॉर्टनलाइफनं सुचवलेल्या काही सुरक्षा उपाययोजना…

संशयास्पद लिंक उघडणं टाळा

दुसऱ्या खेळाडूने इन-गेम चॅटमध्ये पाठवलेली लिंक तुम्हाला दिसते. अशा लिंक क्लिक न करणंच योग्य ठरेल. फिशिंग आणि लिंकवर आधारित इतर घोटाळे सर्रास होत असतात. या लिंक कोण पाठवतं, त्याची सुरुवात कुठून झाली हे कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. मुलांना अशा लिंक येत असतील तर त्यांना हे सांगा की, अशा लिंक अनोळखी माणसांकडून येतात आणि ती उघडल्यास तुमच्या अकाऊंटवर परिणाम होईल.

अकाऊंटबद्दलची माहिती देऊ नका

अकाऊंटची माहिती का देऊ नये, हे मुलांना समजावून सांगायला हवं. मुलांच्या अकाऊंटवर कदाचित काही महत्त्वाची माहिती आणि डिजिटल डेटा असू शकतो. शिवाय, क्रेडिट कार्डाशी संबंधित माहितीही असू शकेल. त्यांनी हेसुद्धा समजून घ्यायला हवं की, गेम कंपन्या कधीही तुमचा बँक अकाऊंट क्रमांक किंवा सोशल सेक्युरिटी क्रमांक अशा प्रकारची माहिती विचारत नाहीत.

सजग रहा

गेमिंग बाजारपेठेची वाढ लक्षात घेता डेव्हलपर्स बऱ्याचदा नवे इन-गेम्स आयटम, मॅप पॅक्स आणि खरेदीचे पर्याय त्यांच्या स्टोअरमध्ये देत असतात. मुलांना कदाचित या व्हर्च्युअल गोष्टी खरेदी कराव्याशा वाटू शकतात आणि तसं ते करूही शकतात. तसं करायचं असल्यास गेम ब्रँडच्या व्यासपीठावरील कायदेशीर बाजारपेठेच्या माध्यमातूनच करावं.

पीआयआय वापरू नका
पर्सनली आयडेंटिफाएबल इन्फॉर्मेशन किंवा पीआयआय म्हणजे अशी माहिती जी एखाद्या विशिष्ट व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरली जाऊ शकते. यात पूर्ण नाव, वय, ई-मेल अॅड्रेस, क्रेडिट कार्डाचा क्रमांक आणि अशी इतर माहिती असते. सायबर गुन्हेगार पीआयआय डार्क वेबला विकू शकतात किंवा आयडेंटिटी थेफ्टसाठी या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. मुलांना त्यांचा कॉमिक बुकमधला आवडता हिरो आणि सिनेमातील व्यक्तिरेखेची काल्पनिक माहिती वापरण्यास सांगा. तसंच त्यांना प्रोफाइल बनवण्याची पूर्ण प्रक्रियाच वगळण्यास सांगू शकता. अनेक ऑनलाइन गेम्ससाठी अशी माहिती आवश्यक नसते. तुम्ही प्रोफाइलमध्ये दिलेली माहिती कदाचित सार्वजनिक स्वरुपावर उपलब्ध असेल. त्यामुळे काळजी घेणं फार गरजेचं आहे, विशेषत: मुलांच्या बाबतीत!

खबरदारीही महत्त्वाची

नेमकं काय खेळायचं, किती खेळायचं आणि कसं खेळायचं याचं नियंत्रण आपल्या हातात आहे. तसंच गेम्समधल्या आभासी जगात किती-कसा वेळ घालवायचा आणि आपल्या खऱ्या जगात किती-कसं जगायचं हेदेखील आपणच ठरवायचं आहे. लहान मुलांना ही निवड करायला पालकांनी, शिक्षकांनी शिकवणं आज गरजेचं आहे. चित्रपट, नाटकं किंवा पुस्तकांप्रमाणेच काही गेम्स चांगले असणार, काही चांगले नसणार, निवड मात्र कायम आपलीच आहे. पण, अनेकदा यात तरुण वाहवत जाताना दिसतात. या तरुणाईला रोखण्यासाठी काही खबरदारीचे उपाय हे योजलेच पाहिजे.

– पबजीमुळे पालक-विद्यार्थी यांच्यातला संघर्ष वाढू लागलाय. हा गेम खेळणारे विद्यार्थी अचानक हिंसकवृत्तीचे बनत असल्यानं, गेम खेळू न दिल्यास कळत-नकळत पालक आणि मुलांमध्ये खटके उडतात. काही वेळा तर मारहाणीपर्यंत वेळ येत असल्याचं चित्र अनेक घरांत दिसून येऊ लागलंय. अशी परिस्थिती तुमच्या घरात उद्भवत असेल, तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडे जायला हवं.

– आपला पाल्य ११ ते १७ या वयोगटातला असल्यास तो कुठला गेम खेळतोय याकडे पालकांनी स्वतः लक्ष द्यावं. त्यानं काय खेळावं याचा निर्णय देखील वेळप्रसंगी घ्यावा.

– अठरा वर्षांपुढील आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांशी सतत संवाद ठेवावा. अतिखेळामुळे काय दुष्परिणाम होतात याची जाणीव त्यांना करून द्या.

– आपला पाल्य दिवसातले किती तास गेम खेळतोय याकडे लक्ष द्या.

– पाल्य पबजीच्या विळख्यात अडकला असेल, तर त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचारांची गरज आहे हे ओळखा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kolhapur Civic Polls: कोल्हापुरात भानामती!; निवडणुकीआधी घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार – black magic before the municipal elections in kolhapur city

हायलाइट्स:कोल्हापूर पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले.कळंबा भागात करणीच्या प्रकारामुळे उलटसुलट चर्चा.इच्छूकांना भीती घालण्यासाठी हे कृत्य केल्याची शक्यता.कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले...

Recent Comments