Home शहरं नागपूर लॉकडाउनमधील बेरोजगारीने तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

लॉकडाउनमधील बेरोजगारीने तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले…


म. टा. प्रतिनिधी, नागपूरः शहरातील एकूण सहा जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यातील एक तरुणाने लॉकडाउन दरम्यान रोजगार गेला आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विवेक माणिकराव लाडकर (वय, ३०, रा. नारायणपेठ) असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

विवेक काही काळापूर्वी खासगी कंपनी काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. लॉकडाउनमुळे सगळे व्यवसाय ठप्प झाले आणि आपल्याकडे जिवीकेचे साधन नसल्याने आपल्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याच्या आशयाची एक चिठ्ठी त्याने आत्महत्येपूर्वी लिहीली आहे. शांतीनगर पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याने बेरोजगारीमुळे त्याने आत्महत्या केली असावी पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याखेरीज हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जगन्नाथ गुणवंतराव ठाकरे (६२) यांनी आत्महत्या केली. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिलीप चंद्रदेव दास (वय, ३५, रा. शांतीनगर) यांनी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमोल जिवन पोटपोसे (वय २५, पाच नल चौक) याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शालीकरामजी माणीकराव धारपुरे (७०, रा. गुरुकुंजनगर) यांनी आत्महत्या केली. याखेरीज मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अभीषेक अभय दुबे (वय, २२, रा. गोरेवाडा) याने गळफास लावून आत्महत्या केली. या सर्वच प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments