Home शहरं नाशिक लॉकडाउनमधून मुक्तीसाठी व्यापाऱ्यांचे साकडे

लॉकडाउनमधून मुक्तीसाठी व्यापाऱ्यांचे साकडेम. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प आहे. अनेक व्यावसायिकांनी लग्न सराईनिमित्ताने कर्ज काढून दुकानात माल भरलेला असून, बँकांचही व्याज सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाने वेळेचे बंधन ठेवून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी या साठी सोमवारी शहरातील व्यावसायिकांनी बागलाणचे प्रातांधिकारी विजयकुमार भांगरे यांची भेट घेतली. शासनाचे निकषानुसार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणेबाबत प्रातांधिकारी ठाम राहिल्याने व्यापारी प्रतिनिधींना हताश होत माघारी परतावे लागले.

सोमवार सकाळी शहरातील व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळाने प्रातांधिकारी विजय भांगर, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील याची भेट घेतली.

लॉकडाउनमुळे व्यवसाय व व्यापार ठप्प असल्याने व्यापारी व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक व्यावसायिकांनी लग्न सराईच्या निमित्ताने लाखो रुपयांचे कर्ज काढून मालाची गुंतवणूक केली आहे. मे महिन्यातील अखेरचा पंधरवाडा व्यवसायासाठी खुला झाल्यास थोडासा दिलासा मिळेल. अन्यथा उद्योग धंद्याची वाताहात हाईल अशी विनंती व्यापाऱ्यांनी केली. वेळेचे बंधन ठेवून व्यवसाय सुरू करण्याची विनंती द्यावी, असे साकडे या व्यापाऱ्यांनी घातले. मात्र प्राताधिकारी भांगरे यांनी बागलाण तालुका रेड झोनमध्ये असून सटाणा शहर कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने ३१ मेपूर्वी अत्याावश्यक सेवा वगळता अन्य सेवा व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे व्यापारी माघारी परतले. या बैठकीस तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, माजी आमदार उमाजी बोरसे, संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, श्रीकांत रौंदळ, राजेंद्र राका, शरद ततार उपस्थित होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Ambani plan to enter e car: रिलायन्सला आता ‘या’ उद्योगाची भुरळ ; नव्या व्यापारी युद्धाची तयारी करत आहेत मुकेश अंबानी – mukesh ambani ready...

हायलाइट्स:नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल आणि रसायन उद्योगाचे विभाजन केले होते.भारतात ई-मोटारींचे पर्व लवकरच सुरू होणार आहे. याकडे अंबानी यांचे लक्षअंबानी यांना आता इलेक्ट्रिक...

Recent Comments