Home मनोरंजन लॉकडाउनमध्ये तिसरा पडदा ठरला सुपरहिट

लॉकडाउनमध्ये तिसरा पडदा ठरला सुपरहिट


उपमा सिंह

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाउन झालं आणि इतर अनेक व्यवसायांप्रमाणेच मनोरंजनसृष्टीही संकटात सापडली. चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद झाली. मालिकांचं चित्रीकरण थांबल्यामुळे नवे भाग प्रसारित होणं थांबलं. या काळात ओटीटी, अर्थात तिसऱ्या पडद्याचा आलेख मात्र चढता राहिला. घरात थांबावं लागलेल्या लोकांनी मनोरंजनासाठी तिसऱ्या पडद्याला पसंती दिली. त्यामुळे ओटीटीच्या व्ह्यूअरशिपमध्ये तब्बल ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लॉकडाउनमध्ये चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण थांबलं. नवे भाग नसल्यामुळे जुन्या लोकप्रिय मालिका दाखवल्या जाऊ लागल्या. त्यांना प्रेक्षकांची पुन्हा एकदा पसंती मिळाली. तरीही मालिकांचे नवीन भाग दिसत नसल्यानं प्रेक्षक काहीसे नाराज होते. पण, मनोरंजनाची ही कसर ओटीटी प्लॅटफॉर्मनं भरुन काढली. प्रेक्षकांना करमणुकीसाठी तिसऱ्या पडद्याचा मोठा आधार मिळाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. ओटीटी प्रेक्षकांना चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज असं सर्व काही बघायला मिळत असल्यामुळे बहुतांश प्रेक्षकांनी लॉकडाउनच्या काळामध्ये ओटीटीकडे मोर्चा वळवला होता. त्यामुळे शेवटच्या तिमाहीत ओटीटीने प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

सब्स्क्रीप्शन वाढलं साठ टक्क्यांनी
अंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग साइट ‘नेटफ्लिक्स’नं दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत १५.७७ दशलक्ष लोकांनी सब्स्क्रीप्शन खरेदी केलं होतं, जे गेल्या वर्षीच्या तुलनेनं दुप्पट आहे. तसंच ‘वेलॉसिटी एमआर’नं केलेल्या सर्वेक्षणानुसार, लॉकडाउनच्या काळात देशात ‘अॅमेझॉन प्राइम’च्या सबस्क्राइबर्सच्या संख्येत ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ‘नेटफ्लिक्स’च्या सबस्क्राइबर्समध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ‘अल्ट बालाजी’च्या सबस्क्राइबर्समध्येदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. याविषयी अल्ट बालाजीचे सीईओ नचिकेत पंतवैद्य सांगतात, की ‘लॉकडाउनच्या काळात आमचं सब्स्क्रीप्शन आणि वॉच टाइम या दोघांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. लॉकडाउनच्या पूर्वी ऑल्ट बालाजीच्या सब्स्क्रीप्शनमध्ये सरासरी १० हजार ६०० नी प्रतिदिन वाढ व्हायची. ती लॉकडाउनच्या काळात सरासरी १७,००० सब्स्क्रीप्शन प्रतिदिन इथवर पोहोचली होती. सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर १.९ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.’

प्रेक्षकसंख्येत चारपट वाढ
‘भौकाल’, ‘समांतर’, ‘एक थी बेगम’, ‘रक्तांचल’ यासारख्या विविध वेब सीरिज प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे एमएक्स प्लेअरचे सीईओ करन बेदी सांगतात, ‘लॉकडाउनमध्ये ओटीटी क्षेत्राच्या प्रेक्षकसंख्येचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. कारण लोक घरात होते. त्यांना मनोरंजनासाठी साधन हवं होतं, ज्यात त्यांना नव्या कलाकृती पाहायला मिळतील. ओटीटीनं प्रेक्षकांची ही गरज भागवली आहे. गेल्या तीन महिन्यांत एमएक्स प्लेअरच्या एकूण प्रेक्षकसंख्येत अडीचपट वाढ झाली असून, ओरिजिनल कंटेंटच्या प्रेक्षकसंख्येत चारपटींनी वाढ झाली आहे.

तिसरा पडदा (वेब सीरिज आणि सिनेमा)
नेटफ्लिक्स : शी, मस्का, मनी हाइस्ट सीजन ४, हंसमुख, मिसेज सीरियल किलर, बेताल, चोक्ड: पैसा बोलता है, बुलबुल, द कारगिल गर्ल (आगामी)

अॅमेजॉन प्राइम व्हिडिओ : पंचायत, रॉकेटमैन, फोर मोर शॉट्स प्लीज, पाताल लोक, गुलाबो सिताबो, शकुंतला देवी (आगामी)

हॉटस्टार : स्पेशल ऑप्स, हंड्रेट, आर्या

एमएक्स प्लेअर : भौकाल, समांतर (मराठी), नेकेड, मनफोडगंज की बिन्नी, एक थी बेगम, रक्तांचल

अल्ट बालाजी : हूज योर डॅडी, एक्सएक्सएक्स अनसेन्सर्ड सीझन २, बारिश २, कहने को हमसफर हैं ३

वूट सिलेक्ट : मर्जी, द रायकर केस, इल्लीगल

जी फाइव्ह : स्टेट ऑफ सीज २६/११, बमफाड, घूमकेतू, रिजेक्ट्स २, चिंटू का बर्थडे, काली २, कसीनोSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments