Home शहरं पुणे लॉकडाउनमध्ये मिळाला मुलीचा ताबा

लॉकडाउनमध्ये मिळाला मुलीचा ताबा


फॅमिली कोर्टात दावा ऑनलाइन पद्धतीने निकाली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलीला पुण्यातील चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी तिचा ताबा वेळेत मिळावा म्हणून आईने दाखल केलेल्या दाव्यात फॅमिली कोर्टाने अर्जदार आईला दिलासा दिला आहे. अॅडमिशनची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या प्रकरणी निकाल व्हावा म्हणून अर्जदाराने लॉकडाउनमध्ये तातडीचा ऑनलाइन दावा पुण्यातील फॅमिली कोर्टात दाखल केला होता.

ऑनलाइन दावा दाखल करण्यात आल्यानंतर दहा दिवसांच्या आत या दाव्याची सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. या दाव्याची संपूर्ण सुनावणी ऑनलाइन पद्धतीनेच झाली.

अर्जदार आईला आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी आहे. पतीबरोबर ती मुंबईला दोन मुलांबरोबर राहत होती. मात्र, त्या दोघांचे पटेनासे झाल्यामुळे मुलाला घेऊन ती पुण्याला निघून आली.

मुलाला पुण्यातील चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. मात्र, मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला न मिळाल्यामुळे सहा महिन्यांच्या प्रश्न असल्यामुळे तिचा ताबा वडिलांकडे होता. दरम्यान, तिने पुण्यातील फॅमिली कोर्टात दावा दाखल करून मुलीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला मिळावा आणि तिचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टाने शाळा संपल्यानंतर पुढील आदेश होईल असे सांगितले होते. या प्रकरणी संबंधित अर्जदार महिला हायकोर्टात गेली. हायकोर्टाने मुलीच्या शाळेचा दाखला देण्यात यावा असा आदेश दिला होता. या आदेशाबाबत फॅमिली कोर्टाला माहिती देण्यासाठी तसेच मुलीचा ताबा प्रवेश सुरू होण्याच्या आधी मिळावा म्हणून अर्जदार महिलेने कोर्टात दावा दाखल केला होता .

मार्च महिन्यात हा दावा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच लॉकडाउनची घोषणा झाली.

प्रवेशाचा प्रश्न असल्यामुळे दावा तातडीने निकाली निघावा म्हणून अर्जदार महिलेच्या वकील अॅड. सुप्रिया कोठारी यांनी ऑनलाइन दावा फॅमिली कोर्टात दाखल केला होता. दाव्याची सुनावणी घेण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे समुपदेशकांनी ऑनलाइन समुपदेशन केले. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी ऑनलाइन सुनावणी घेऊन या दाव्याचा निकाल दिला. अर्जदार महिलेने आपण कमावते असून, मुलीच्या शिक्षणासाठी पतीकडून कोणतीही रक्कम नको असल्याचे सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले. संबंधित मुलीचा भाऊ दहा वर्षे ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत तिचा प्रवेश व्हावा, असे कोर्टाने आदेशात नमूद केले. तसेच, दोन्ही मुलांबरोबर वडिलांना सोमवारी आणि बुधवारी फोन किंवा व्हिडिओ कॉलने दहा मिनिटांसाठी बोलता येईल. लॉकडाउन संपल्यानंतर आठवड्यातून एकदा भेटता येईल असा आदेश कोर्टाने दिला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेल्या ‘या’ महान क्रिकेटपटूंना वाहणार श्रद्धांजली – india, australia players to wear black armbands during...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मुंबईत निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे...

Recent Comments