Home देश लॉकडाऊनचं उल्लंघन, पिता-पुत्राचा कोठडीत मृत्यू; काँग्रेसकडून न्यायाची मागणी

लॉकडाऊनचं उल्लंघन, पिता-पुत्राचा कोठडीत मृत्यू; काँग्रेसकडून न्यायाची मागणी


चेन्नई : तामिळनाडूच्या तुतीकोरीनमध्ये पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या पिता-पुत्राच्या मृत्यूनंतर पोलिसांना या मृत्यूसाठी जबाबदार धरलं जातंय. या प्रकरणामुळे राजकारणही ढवळून निघालंय. यांनीही सोशल मीडियावरून या प्रकरणात दु:ख व्यक्त केलंय.

लॉकडाऊनमध्ये दुकानं सुरू ठेवलं म्हणून…

मिळालेल्या माहितीनुसार, जयराज (५९ वर्ष) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स (३१ वर्ष) यांनी पोलिसांनी १९ जून रोजी ताब्यात घेतलं होतं. लॉकडाऊन दरम्यान मोबाईल एक्सेसरीजचं दुकानं सुरू ठेवण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. फेनिक्स याचा सोमवारी कोविलपट्टी जनरल हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला तर त्याच्या वडिलांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला. मृतदेहाचं शवविच्छेदन तिरुनेलवेलीच्या सरकारी रुग्णालयात करण्यात आलं.

न्यायालयानं घेतली दखल

पीडित कुटुंबानं दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तुतीकोरीनचं जिल्हाधिकारी संदीप नंदूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अत्याचाराची तक्रार मिळाली असून प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तसंच मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठानंही या प्रकरणाची दखल घेतलीय. न्यायालयानं पोलीस अधिक्षकांकडे घटनेच्या रिपोर्टची मागणी केलीय.

वाचा :
वाचा :

तमिळनाडूमध्ये राजकारण तापलं

या प्रकरणी विरोधी पक्ष द्रमुख मुन्नेत्र कळघमनं सरकारला धारेवर धरलंय. डीएमके खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिका आयोगाला (NHRC) पत्र लिहून दखल घेण्याची विनंती केलीय. पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात योग्य कारवाई आणि चौकशी करण्याचा आग्रह त्यांनी या पत्राद्वारे केलाय. शुक्रवारी त्यांनी पीडित कुटुंबाची भेटही घेतली तर पक्षाचे नेते एम के स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांचा मदतनिधी दिलाय.

राहुल गांधींचं ट्विट

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. ‘पोलिसांद्वारे हिंसा हा एक भयंकर गुन्हा आहे. रक्षकच शोषक बनले आहेत, हे विडंबन आहे’ असं त्यांनी म्हटलंय.

नागरिकांनी आक्रोश केला व्यक्त

या घटनेच्या विरोधात तुतीकोरीनमध्ये सर्व दुकानं बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री ई के पलानीस्वामी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं परंतु, आरोपांबद्दल काही वक्तव्य करणं त्यांनी टाळलं. पीडित कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकरीचं आश्वासन त्यांनी दिलंय.

वाचा :

वाचा :Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai local train: ‘सर्वांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी तरी लोकल ट्रेन सुरू करा’ – kalyan-kasara railway passengers welfare association demands to allowed students for travels...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के...

LIVE : गडचिरोलीतील 350 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी | Maharashtra

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुशखबर सर्वांसाठी लोकल प्रवासाची लवकरच मुभा? 'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह माहिती लोकलसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक Source link

Recent Comments