Home देश लॉकडाऊनचा कालावधी : ३ मेनंतरही सुरू राहणार लॉकडाऊन? तीन राज्यांची मागणी -...

लॉकडाऊनचा कालावधी : ३ मेनंतरही सुरू राहणार लॉकडाऊन? तीन राज्यांची मागणी – coronavirus : three states in favour of lockdown extension in hotspots beyond may 3


नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात दोन टप्प्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे रोजी समाप्त होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत सुरूच राहणार अशी घोषणा केली होती. परंतु, कोविड-१९ रुग्णांची संख्या अजूनही थांबण्याचं नाव घेईना… त्यामुळे अनेक राज्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याची मागणी केलीय. करोनासाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीनं राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर शनिवारी आणखीन पाच राज्यांनी अशीच मागणी करत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी केलीय.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी पुढे वाढवण्याची मागणी केलीय. करोनामुळे सर्वात जास्त प्रभावी झालेल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील ९२ टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई-पुण्याचे आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे. परंतु, यावर पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

वाचा :
देशभरात रुग्णांची संख्या २६ हजाराच्या पुढे

वाचा :
रॅपिड अँटीबॉडी टेस्टवर तूर्तास स्थगिती, सूत्रांची माहिती


आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांनी मात्र आपण केंद्र सरकारच्या निर्देशाचं पालन करू असं सांगितलंय.

आसाम, केरळ आणि बिहार या संदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर कोणत्याही निर्णयावर पोहचणार असल्याचं समजतंय.

यापूर्वी, तेलंगणानं लॉकडाऊनचा कालावधी ७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केलीय. ५ मे रोजी लॉकडाऊन आणखीन वाढवण्याची गरज आहे का? याचा आढावा राज्य सरकारकडून घेतला जाणार आहे.

वाचा :
लॉकडाऊनः पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’

वाचा :
अडकलेल्या मजुरांना आणताना करोनाही येईलः गडकरी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

virat kohli: सर्वाधिक गुण असूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर; विराट कोहलीने आयसीसीला विचारला सवाल – it is confusing, difficult to understand: virat kohli on...

सिडनी : भारतीय संघाचे सर्वाधिक गुण असूनही आम्ही दुसऱ्या स्थानावर का, असा सवाल भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयीसीसीला केला आहे. आयीसीसीचा नवा नियम...

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

Recent Comments