Home शहरं औरंगाबाद ‘लॉकडाऊन’मध्येही ‘अप-डाऊन’

‘लॉकडाऊन’मध्येही ‘अप-डाऊन’म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

करोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात प्रशासनाने अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असतानाही तहसीलदारांसह तालुक्यातील काही प्रमुख अधिकारीच ‘अप-डाऊन’ करीत आहेत.

करोनाच्या राष्ट्रीय संकटात प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. असे असतानाही वरिष्ठांच्या आदेशाकडे काणाडोळा करून तालुक्यातील काही अधिकारी व कर्मचारी नियमितपणे इतर ठिकाणांहून दररोज ‘अप-डाऊन’ करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या प्रक्रियेलाच एक प्रकारे खो दिला जात आहे. शिवाय या सूचनांची माहिती गावपातळीपर्यंत पोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. करोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्यापूर्वी हे अधिकारी ‘अप-डाऊन’ करीत होते. त्यावर फारसा कोणी आक्षेप घेत नव्हते. आता करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत. त्यामुळे कार्यालयीन वेळ झाली तरी हे अधिकारी वेळेत कार्यालयात पोचत नसल्याची बाब फुलंब्रीत दिसते. त्यामध्ये अधिकारी कर्मचारी औरंगाबादहून ‘अप-डाऊन’ करीत आहेत. सध्या औरंगाबाद शहर हे ‘रेड झोन’मध्ये असून तालुक्यातील ग्रामीण भागात याच संसर्ग पसरू नये म्हणून गाव पातळीवर पोलिस प्रशासन, सरपंच, पोलिस पाटील, आरोग्य विभाग आदी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार देखील बंद झाला आहे. तरीही आपल्या गावात करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण काळजी घेत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक घरातच थांबून आहेत, मात्र याउलट शासकीय अधिकारी कर्मचारी हे सोयीनुसार ‘अप-डाऊन’ करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Bशीघ्र कृती दलातील अधिकाऱ्यांचीच ‘ये-जा’B

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शीघ्र कृती दल तयार करण्यात आले आहे. या दलातील बहुतांश अधिकारीच औरंगाबाद येथे राहतात. ते औरंगाबाद येथून ‘ये-जा’ करीत आहे.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी हजर रहावे, असे प्रशासनाचे सक्त आदेश आहेत, मात्र चौकशी केली असता, बहुतांश अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत. याबाबत आम्ही गावोगावी चौकशी करून हजर नसणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.

– सुधाकर शिंदे जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना

फुलंब्री येथे शासकीय निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या औरंगाबाद येथूनच ‘ये-जा’ सुरू आहे.

– सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, फुलंब्रीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Vanchit Bahujan Aghadi: रेशनकार्डसाठी बायको द्या, तहसिलदारांसमोर युवकाचे अनोखे आंदोलन – vanchit bahujan aghadi protest for ration card in ahmednagar

अहमदनगर: सरकारी कार्यालयातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा अनोखी आंदोलने केली जातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोरही एका युवकाने असेच वेगळे आंदोलन केले....

rajasthan: धक्कादायक! तरुणीचे मामाच्या गावातून अपहरण; १४ दिवस बलात्कार – man kidnapping and raping 20 year old woman for 14 days in kota in...

कोटा: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सलग १४ दिवस बलात्कार...

Banking services impacted in Maharashtra: All India Strike बँकिंग सेवा ठप्प; देशव्यापी बंदला राज्यभरातील बँक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – banking services impacted in maharashtra...

मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज राज्यातील बँकिंग कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक या...

Recent Comments