Home देश पैसा पैसा लॉकडाऊनमध्येही खतांची विक्रमी विक्री

लॉकडाऊनमध्येही खतांची विक्रमी विक्री


नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झालेली असली तरी देशात खतांची विक्रमी विक्री झाली आहे. एप्रिल २०१९ च्या तुलनेत एप्रिल २०२० मध्ये ही विक्री ४५.०१ टक्क्यांनी जास्त झाली आहे. एप्रिल महिन्यातील पहिल्या २२ दिवसात विक्री केंद्रांवरील खतांची विक्री ही १०.६३ लाख मेट्रीक टन एवढी राहिली, जी गेल्या वर्षी याच काळात ८.०२ लाख मेट्रीक टन एवढी होती. तर व्यापाऱ्यांनी या काळात १५.७७ लाख मेट्रीक टन खतांची खरेदी केली, जी गेल्या वर्षी याच काळातील खरेदीच्या ४६ टक्के (१०.७९ लाख मेट्रीक टन) जास्त आहे. खत आणि रसायन मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

आगामी पाहता खतांची विक्री अत्यंत सुलभरित्या होईल याची काळजी सरकारकडून घेण्यात आली होती. देशात खतांचा कोणताही तुटवडा नसून राज्यांनी पुरेसा साठा करुन ठेवला आहे, अशी माहिती खत आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी दिली. पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी खताचा पुरेसा साठा उपलब्ध होईल, असं आश्वासनही गौडा यांनी दिलं. सरकारने खतांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यात समावेश केला होता. यामुळे खत निर्मिती चालू राहिली. लॉकडाऊनचा शेतीवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, यावर्षीच्या मान्सून अंदाजाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शेतीचं काम हे साधारणपणे चालू असून या क्षेत्राची वार्षिक वाढ ३ टक्के राहिल, असा अंदाज गेल्या आठवड्यात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी वर्तवला होता. एकूण जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा ०.५ टक्के राहिल, असंही ते म्हणाले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments