Home ताज्या बातम्या लॉकडाऊनमध्ये बाईकवरून पडला बाहेर, बाजूला घेत अशी शिक्षा दिली की पोलिसांचं होतंय...

लॉकडाऊनमध्ये बाईकवरून पडला बाहेर, बाजूला घेत अशी शिक्षा दिली की पोलिसांचं होतंय कौतुक; पाहा VIDEO police give punishment to two wheeler rider in lockdown download arogya setu app mhsy | National


लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या बाईकस्वाराला पोलिसांनी दिलेल्या अभिनव शिक्षेचं सध्या कौतुक होत आहे.

मुंबई, 20 एप्रिल : देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मात्र तरीही काही लोक घरातून विनाकारण बाहेर पडत आहे. असाच एक व्यक्ती घरातून बाहेर पडला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला दिलेल्या शिक्षेचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.

पोलिसांनी त्याला पकडलं आणि तुझी बाईक जप्त करतो असं सांगितलं. तेव्हा ती व्यक्ती पोलिसांसमोर हात जोडून गयावया करू लागली. एका ट्विटर युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटलं आहे की, उत्तर प्रदेश पोलिसांचा अनोखा अंदाज. पंतप्रधान मोदींनाही या मध्ये टॅग करत या अभिनव शिक्षेबद्दल काय सांगाल असंही विचारलं आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं हा प्रकार घड़ल्याचं म्हटलं जात आहे. चौकात जेव्हा पोलिसांनी एका बाईकस्वाराला पकड़लं तेव्हा त्याला Aarogya Setu अॅप डाउनलोड करायला लावलं. फक्त एवढंच नाही तर ते अॅप आणखी तीन जणांना डाऊनलोड करायला सांग त्याशिवाय इथून सोडणार नाही अशी अटही घातली.

हे वाचा : … आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. त्यासाठीच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र काही लोक याला गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसतं. सरकारने कोरोना रोखण्यासाठी लोकांना Aarogya Setu अॅपचाही वापर कऱण्यास सांगितलं आहे.

हे वाचा : कोरोनाची संशयित पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीनं घरीच केले उपचार

First Published: Apr 20, 2020 07:33 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments