Home ताज्या बातम्या लॉकडाऊनमध्ये राज्यांनुसार धावणार 300 स्पेशल ट्रेन? असा आहे रेल्वेचा प्लॅन during the...

लॉकडाऊनमध्ये राज्यांनुसार धावणार 300 स्पेशल ट्रेन? असा आहे रेल्वेचा प्लॅन during the lockdown covid-19 indian railways expected to run 300 Shramik Special Train mhpg | National


1 मेपासून भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात घेऊन जाण्यासाठी अनेक गाड्या सुरू केल्या आहेत.

चंदन जज

नवी दिल्ली, 05 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा परिणाम परराज्यांमध्ये अडकलेल्या मजूरांवर होत आहे. यासाठी 1 मेपासून भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात घेऊन जाण्यासाठी अनेक गाड्या सुरू केल्या आहेत. या विशेष गाड्यांना ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ (Shramik Special Train) असे नाव देण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मते, सोमवारपर्यंत अशा 58 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत भारतीय रेल्वेमार्फत अशा प्रकारच्या आणखी 300 गाड्या चालवण्याची मागणी होऊ शकते, त्यासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झाली आहे.

300 गाड्या चालवण्याचा विचार

रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी केवळ लोकांना इतर राज्यांत पाठवणारे आणि त्या मजूरांना सोडण्यात येणारे राज्य एकमेकांशी बोलू शकतात, त्यानंतर रेल्वेयाबाबत अंतिम निर्णय घेईल. या गाड्यांमध्ये स्थलांतरित मजुर व्यतिरिक्त विविध राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना, पर्यटकांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, सध्या लोकांकडू तिकिटीचे पैसे आकारण्यावरूनही वाद सुरू आहेत. सरकारवर असा आरोप केला जात आहे की, एअर इंडियाने परदेशात अडकलेल्या कोट्यावधी लोकांना विनामूल्य भारतात आणले, परंतु गरीब मजुरांना गावी जाण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. दरम्यान, हा वाद केवळ भाड्याचा नाही तर भाड्यावर 50 रुपये जादा शुल्क वसूल करण्यावर आहे.

वाचा-दिल्लीमध्ये दारू महागली, सरकारनं लावला 70 टक्के अतिरिक्त टॅक्स

असा आहे रेल्वेचा प्लान

भारतीय रेल्वेने आधीच सांगितले आहे की श्रमिक विशेष रेल्वेगाडीचे फक्त एकच अंतिम स्थान असेल. ही ट्रेन कोठेही थांबणार नाही. श्रमिक स्पेशल ट्रेन 500 किमीपेक्षा जास्त अंतरासाठी धावेल. अशा प्रत्येक ट्रेनमध्ये 1000 ते 1200 प्रवाशांना बसण्याची सुविधा आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार अडकलेल्या लोकांना वाहून नेण्याच्या क्षमतेची 90 टक्के मागणी असेल तेव्हाच खास कामगार गाड्या चालवल्या जातील. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील कामगारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सोमवारीही त्यांच्या वेळापत्रकातून अनेक कामगार विशेष गाड्या धावत आहेत. ट्रेन लखनऊ, गोरखपूर, रांची, जसीडिह, धनबाद, हटिया, दानापूर स्थानकांवरही पोहोचली आहे. यावेळी रेल्वेस्थानक व बसेसमधील सामाजिक अंतरांचीही पूर्ण काळजी घेतली जात आहे.

वाचा-निर्बंध कायम! पुण्यात अजूनही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

First Published: May 5, 2020 07:26 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

world Test championship: IND vs ENG : विजयानंतरही भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो धक्का, पाहा समीकरण… – ind vs eng : if team...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी...

PM Modi: pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, ‘दलालांमुळे शेतकऱ्याची…’ – pm modi address bjp rally in coimbatore our govt that had...

कोईम्बतूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांची कोईम्बतूरमध्ये प्रचारसभा झाली. सरकार सर्व वर्गाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मी नुकताच एका कार्यक्रमातून...

lic ipo process: LIC IPO केंद्र सरकार लागले कामाला ; ‘एलआयसी’च्या प्रमुखांनी दिली ही महत्वाची माहिती – lic md says ipo process began

हायलाइट्स:आयपीओमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांना यादेखील राखीव हिस्सा ठेवण्यात येणार आहे.केंद्र सरकार आणि एलआयसी अशा दोन्ही बाजूने आयपीओ बाबत काम सुरु चालू आर्थिक वर्षातच आयपीओची...

Recent Comments