Home शहरं पुणे 'लॉ'च्या केवळअंतिम वर्षाच्या परीक्षा

'लॉ'च्या केवळअंतिम वर्षाच्या परीक्षाम. टा. प्रतिनिधी, पुणेकरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशातील विविध महाविद्यालयांमध्ये ‘लॉ’चा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांची परीक्षा द्यावी लागणार नाही. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन; तसेच परीक्षेशिवाय प्रमोट केले जाणार आहे. मात्र, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत.बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पत्रकानुसार लॉच्या तीन; तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मागील वर्षाचे गुण; तसेच चालू वर्षाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे प्रमोट केले जाईल. कॉलेज सुरू झाल्यानंतर संस्थांची इच्छा असेल, तर ज्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेता येऊ शकेल. मात्र, यासाठी एक वेळेची विशिष्ट मर्यादा असेल. तीन किंवा पाच वर्षांचा अभ्यासक्रम करीत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत समाविष्ट होण्याचीही परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

energy minister nitin raut: वीज घोळ ‘टाटा पॉवर’मुळेच – energy minister nitin raut asks question to officers over mumbai power outage

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईत १२ ऑक्टोबरला निर्माण झालेल्या वीज घोळाला टाटा पॉवरच जबाबदार आहे. अखेर 'आयलॅण्डिंग' अयशस्वी झालेच कसे, ते अयशस्वी झाल्यानेच वीज...

Oil India Vacancy 2020: केंद्र सरकारी नोकरीची संधी; वेतन ५० हजार ते २ लाख मासिक – oil india vacancy 2020 for group a, b,...

Oil India Vacancy 2020: डिप्लोमा, सामान्य पदवीधर ते अभियंते व डॉक्टरांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची संधी चालून आली...

uk royal family employee: ब्रिटनच्या राजवाड्यात हाउसकिपिंगसाठी भरती; पगार ऐकाल तर चक्रावून जाल! – uk royals are offering rs 18.5 lakh as starting salary...

लंडन: ब्रिटनच्या राजघराण्याबद्दल जगभरात कुतूहल आहे. त्यांची शाही परंपरा, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत अनेकांना रस असतो. ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या सेवेत, त्यांच्याकडे नोकरी करण्याचेही अनेकजण...

Recent Comments