Home मुंबई नवी मुंबई ‘वंदे भारत’मधील किती प्रवासी पॉझिटिव्ह?

‘वंदे भारत’मधील किती प्रवासी पॉझिटिव्ह?तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या ‘वंदे भारत मोहिमें’तर्गत आलेले काही प्रवासी परदेशातून प्रवास सुरू करण्यापूर्वी करोना निगेटिव्ह होते आणि मायदेशी परतल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले, असा काही तपशील आहे का, तसा असल्यास तो आज, बुधवारी सादर करा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार, हवाई वाहतूक मंत्रालय व नागरी विमान वाहतूक महसंचालनालयाला (डीजीसीए) दिले.

‘हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या ‘डीजीसीए’ने २३ मार्च रोजी एक परिपत्रक काढून सुरक्षित वावर राहण्याच्या दृष्टीने विमानातील तीन आसनांपैकी मधील आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ‘वंदे भारत मोहिमें’तर्गत प्रवाशांची वाहतूक करताना ‘एअर इंडिया’कडून मधले आसन रिक्त ठेवण्यात आले नाही,’ असा आक्षेप नोंदवणारी याचिका ‘एअर इंडिया’चे वैमानिक देवेन कयानी यांनी अॅड. अभिलाश पनिकर यांच्यामार्फत केली. त्याविषयीच्या पुढील सुनावणीनंतर न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ‘डीजीसीए’ व ‘एअर इंडिया’तर्फे या वेळी केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडताना ‘वंदे भारत मोहिमे’मध्ये ‘सुरक्षित वावर’ची पूर्ण काळजी घेतल्याचा दावा केला. ‘जे प्रवासी मधील आसनावर बसले होते, त्यांना तीन स्तरांचे मास्क दिले होते. त्याचबरोबर ‘फेसशील्ड’सह सुरक्षिततेची अन्य साधनेही पुरवण्यात आली होती. सुरक्षिततेच्या या उपायांविषयी तज्ज्ञ समितीनेही समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे वैमानिकाच्या याचिकेतील आरोपांत कोणतेही तथ्य नाही,’ असा दावा करून याचिका फेटाळण्याची विनंती मेहता यांनी केली. ‘डीजीसीएने ३१ मे रोजी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार शक्यतो मधील आसन रिक्त ठेवा किंवा त्या आसनावर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला विशिष्ट प्रकारचे गाउन द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत,’ अशी माहितीही मेहता यांनी न्यायालयाला दिली. खंडपीठाने त्याची नोंद घेऊन पुढील सुनावणी गुरुवार, ४ जून रोजी ठेवली.

कयानी यांच्या या याचिकेची उच्च न्यायालयाने २२ मे रोजी गंभीर दखल घेऊन ‘एअर इंडिया’ला फटकारले होते. ‘डीजीसीए’ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ‘एअर इंडिया’ला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ‘एअर इंडिया’ व ‘डीजीसीए’ने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रशासनांना २५ मे रोजी अंतरिम दिलासा देतानाच व्यावसायिक विमान कंपन्यांचा विचार करण्याऐवजी विमानांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे खडे बोल सुनावले होते. त्या पार्श्वभूमीवर, ‘डीजीसीए’ने ही नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

America: आवश्यक दिलासा – green card eligibility categories and indian citizens

अमेरिकेत अनेक वर्षे राहून काम करणाऱ्या हजारो भारतीयांना, त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आणि अतिशय आवश्यक असणारा दिलासा अमेरिकी सिनेटने दिला आहे.  Source link

ranjitsinh disale: रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन – cm uddhav thackeray congratulates global teacher winner ranjitsinh disale

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Recent Comments