Home ताज्या बातम्या वडिलांना वाटलं की मुलगा शिपाई होईल; परंतू त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवून...

वडिलांना वाटलं की मुलगा शिपाई होईल; परंतू त्याने टीम इंडियामध्ये स्थान मिळवून केले 12 शतक | National


त्याने आपल्या आई-वडिलांना विश्वास दिला की घाबरु नका, आपण आत्महत्या करणार नाही.

नवी दिल्ली, 27 जून : 61 कसोटी सामने, 3982 धावा, 12 शतके आणि 15 अर्धशतके. ही टीम इंडियातील एका अशा खेळाडूची कामगिरी आहे, ज्याने अवघड परिस्थितीत भारतीय संघासाठी सलामीची फलंदाजी केली आणि अनेक सामने जिंकूनही दिलेत. तुम्ही ओळखलंच असेल या खेळाडूंचे नाव, मुरली विजय. हो मुरली विजयच. या क्रिकेटपटूने बराच काळ भारतीय संघाकडून सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी पार पाडली.

आज 36 वर्षांचा हा क्रिकेटपटू भारतीय संघाबाहेर असला तरी मुरलीने अशी उत्तुंग कामगिरी केली आहे की, ज्या कामगिरीचा विचार त्याच्या कुटुंबीयांनीही कधी केला नव्हता. त्याच्या वडिलांना नेहमी वाटत असे की आपला मुलगा हा नक्कीच शिपाई होईल. मात्र मुरली आपल्या जिद्दीनं खूप पुढे गेला.

मुरली विजयचा प्रवास

मुरली विजयचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात 1 एप्रिल 1983 रोजी झाला. परिवाराची आर्थिक स्थिती चांगली होती, मात्र मुरली विजय अभ्यासात फारच मागे होता. शिकण्यात मुरलीचे मन अजिबात लागत नसे, या प्रवासातच 12 वीच्या परीक्षेत मुरलीला अपयश आले. परीक्षेत नापास झाल्यानंतर मुरली विजयने घर सोडून दिले. अपयशाने खचलेल्या मुरली विजयने चुकीच्या मार्गाने जाऊ नये, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत होते. मात्र मुरली विजयचे लक्ष्य वेगळेच होते. त्याने आपल्या आई-वडिलांना विश्वास दिला की घाबरु नका, आपण आत्महत्या करणार नाही. आपल्याला जसं जगायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला पुढेही राहायचे आहे. स्वत:ची ओळख निर्माण करायची असल्याचे मुरलीने कुटुंबीयांना सांगितले.

घर सोडून मुरली त्याच्या मित्रांच्या घरी राहायला गेला. अनेक वेळा तर चैन्नईच्या वायएमसीए किंवा आयआयटीच्या क्रिकेट मैदानावरही तो झोपत असे. क्रिकेट खेळण्याबरोबरच चरितार्थ चालविण्यासाठी स्नूकर पार्करमध्ये तो नोकरी करीत असे.

मुरली विजयचे टॅलेंट त्या काळी भारतीय गोलंदाजांचे सध्याचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी पहिल्यांदा ओळखले. अरुण यांनी पहिल्यांदा चैन्नई क्रिकेट लीगकडून खेळण्यासाठी आग्रह धरला. या खेळीत मुरलीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. 21 व्या वर्षात पदार्पण करेपर्यंत तामिळनाडू रणजी संघाकडून खेळण्यासाठी मुरली तयार झाला होता. त्यावेळी मुरलीचे केस मोठे असल्याने त्याची संघात निवड होऊ शकली नाही.  

First Published: Jun 27, 2020 11:29 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments